IMPIMP

MP Navneet Rana | ‘आधीच अडीच वर्षे नुकासान झालंय, मतभेद बाजूला ठेवून एकत्रित या’, रवी राणा-बच्चू कडूंच्या वादावर नवनीत राणांचे पहिल्यांदाच भाष्य (व्हिडिओ)

by nagesh
Navneet Rana | shivdi court navneet rana father harbhajan singh was declared fugitive by the court

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाईन  भाजप (BJP) समर्थक आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि शिंदे गटाचे समर्थक आमदार बच्चू कडू (MLA Bachchu Kadu) यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरु आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्याने त्यांच्यातील वाद शमला. मात्र यानंतर दोन्ही बाजूंनी तो पुन्हा भडकताना दिसत आहे. या दोघांच्या वादावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी पहिल्यांदाच भाष्य करताना दोन्ही नेत्यांना आपल्यातील वाद बाजूला ठेवून एकत्रित येण्याची विनंती केली आहे. आपले वाद मिटवा व जनतेचे रखडलेले प्रश्न मार्गी लावा, जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, अशी विनंती नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी दोन्ही नेत्यांना केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नवनीत राणा काय म्हणाल्या?

अमरावती जिल्ह्यातील आमदार बच्चू कडूजी आणि आमदार रवी राणाजी यांच्यात जे गैरसमज आणि विसंवाद आहे, जे मतभेद चार पाच दिवसांपासून सगळे जण पाहत आहेत, मी अमरावती जिल्ह्याची खासदार या नात्याने दोघांना विनंती करते, की गेली अडीच वर्ष आपल्या संपूर्ण जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. आता सक्षम सरकार आपल्या पाठीशी आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत, एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आपल्या पाठीशी आहेत, तर मी कडू आणि राणा यांना जिल्ह्यातील लोकांच्या वतीने आग्रह करेन, की आपण सगळे एकत्र आलो पाहिजे आणि जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम केले पाहिजे.

गेले अडीच वर्षे आपले अनेक प्रश्न रखडले होते, त्यामुळे ते पूर्ण करुन आपण जनतेला न्याय दिला पाहिजे.
म्हणून एक खासदार या नात्याने मी दोन्ही आमदारांना विनंती करेन की सगळे मतभेद सोडून एकत्रित येऊन आपण
जनतेला न्याय दिला पाहिजे, त्यासाठी विचार केला पाहिजे, अशी विनंती खासदार नवनीत राणा
(MP Navneet Rana) यांनी केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- MP Navneet Rana | amravati mp navneet rana reacts on ravi rana bacchu kadu dispute political news

हे देखील वाचा :

Sushma Andhare | शिंदे गटातील ‘हा’ आमदार आमच्या संपर्कात, सुषमा अंधारेंचा जळगावमध्ये मोठा दावा

Chandrakant Patil | उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न- चंद्रकांत पाटील

Promotion Of Deputy Collector To Additional Collector In Maharashtra | राज्यातील 19 उप जिल्हाधिकार्‍यांना अपर जिल्हाधिकारीपदी बढती, पदोन्नतीने बदल्या

Related Posts