MP Navneet Rana | पोलीस कोठडीत हीन वागणूक दिल्याचा नवनीत राणांचा आरोप, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी पोलीस कोठडीत त्यांच्यासोबत हीन वागणूक झाल्याचा आरोप केला आहे. नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्या आरोपांवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Maharashtra Home Minister Dilip Walse Patil) यांनी आज स्पष्टीकरण दिले आहे. नवनीत राणा यांनी पोलीस कोठडीत (Police Custody) त्यांच्यासोबत छळ आणि हीन दर्जाची वागणूक (Inhumane Treatment) केल्याची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे (Lok Sabha Speaker) केली आहे. लोकसभा अध्यक्षांनी यासंदर्भात पत्र लिहून तथ्यावर आधारित माहिती मागवली असून राज्य सरकार (Maharashtra State Government) याची माहिती लवकरच पाठवणार असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी आरोप करताना म्हटले की, मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कोठडीत आपण अनुसुचित जातीचे असल्याने पिण्यास पाणी दिले नाही. तसेच वॉशरुमला देखील जाऊ दिले नाही, असा आरोप राणा यांनी केला आहे. याबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देताना त्यांना हीन वागणूक देण्याचा प्रकार घडला नसल्याचे सांगितले.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपासंदर्भात मी स्वत: चौकशी केली आणि तसं काही घडलं अशी वस्तूस्थिती नाही. त्यांच्यासोबत कोणतीही हीन वागणूक देण्याचा प्रकार घडलेला नाही. राणा दाम्पत्यावर आतापर्यंत झालेली कारवाई पूर्णपणे कायदेशीर आहे. यासंदर्भात मी अधिक बोलणार नाही. कारण त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे याबाबत तक्रार केली आहे आणि लोकसभा अध्यक्षांनी याबाबत तथ्यावर आधारित माहिती आमच्याकडे मागितली आहे. ती लवकरच त्यांना पाठवली जाईल.
राज ठाकरेंचा सभेचा निर्णय दोन दिवसात
औरंगाबादमध्ये 1 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या सभेला पोलिसांकडून अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.
याबाबत दिलीप वळसे पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की,
येत्या दोन दिवसांमध्ये राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी द्यायची की नाही याबाबत निर्णय दिला जाईल.
औरंगाबादचे पोलीस आयुक्त (Aurangabad CP) याबाबतचा निर्णय घेतील.
या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची (Law and Order) परिस्थिती लक्षात घेऊन ते निर्णय घेतील.
त्यांच्या सभेला परवानगी द्यायची की नाही हे पोलीस आयुक्तच ठरवतील.
राज्य सरकार ठरवणार नाही, अशी महत्त्वाची माहिती वळसे पाटील यांनी दिली.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
Web Title :- MP Navneet Rana | Maharashtra home minister-dilip walse patil says no any inhumane treatment to mp navneet rana in jail and police custody
Harmful Habits For Brain | ‘या’ रोजच्या 4 सवयी तुमच्या मेंदूला आतून पोकळ करतात; जाणून घ्या सविस्तर
Comments are closed.