IMPIMP

MP Navneet Rana | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ ! मुंबई पोलिसांवर खोटे आरोप करणे महागात पडणार?

by nagesh
Navneet Rana-Ravi Rana | navneet rana ravi rana hanuman chalisa row conditional bail sedition free speech

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MP Navneet Rana | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) आरोप केले होते. मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा दावा नवनीत राणांनी केला होता. याबाबत एक पत्र थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Lok Sabha Speaker Om Birla) यांना पाठवले होते. मात्र आज मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे (CP Sanjay Pandey) यांनी थेट ट्विट करत नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांना आदराची वागणूक दिल्याचे निदर्शनास आणले. त्यामुळे खोटे आरोप (False Allegation) केल्याप्रकरणी नवनीत राणांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप मुंबई पोलीसांवर केला होता. राणा यांनी केलेल्या तक्रारीत खार पोलीस ठाण्यात (Khar Police Station) चुकीच्या वागणुकीचा उल्लेख केला गेला आहे. पण, मध्यरात्रीच्या सुमारास राणा यांना सांताक्रुझ पोलीस ठाण्यात (Santa Cruz Police Station) नेण्यात आले होते. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणा दाम्पत्य पोलीस ठाण्यात चहा घेत असल्याचा व्हिडीओ सादर केला. त्याचबरोबर मुंबई पोलिस आणखी एक व्हिडिओ समोर आणण्याच्या प्रयत्नात आहेत. या व्हिडिओत नवनीत राणा यांना त्यांच्या मागणीनंतर प्रसाधनगृहात नेण्यात आले होते. प्रसाधनगृह बाहेरील सीसीटीव्हीत (CCTV) हे दृश्य कैद झालेय.

दरम्यान, मुंबई पोलिसांवर खोटा आरोप केल्यानंतर आता नवनीत राणा अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करणे, पोलिसांवर खोटे आरोप करणे याप्रकरणी नवनीत राणा यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल होण्याची शक्यता
असल्याची माहिती सूत्राकडून देण्यात येत आहे. त्याचबरोबर याबाबतचा अहवाल लवकरच लोकसभा
सचिवांना पाठवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Web Title :- MP Navneet Rana | navneet rana case mumbai police may be register case against her in false allegation charges

हे देखील वाचा :

Shivsena Leader Deepali Sayed | ‘त्या’ कारमध्ये मोदी असते तरीही ती फोडली असती, हे बाळासाहेबांचे शिवसैनिक’

Mango Seeds Health Benefits | चुकूनही फेकू नका आंब्याचे बाटे, Cholesterol सारखे 5 गंभीर आजार होतील दूर; जाणून घ्या कसा करावा वापर

WhatsApp Group Voice Call New Feature | आता तब्बल 32 लोकांशी एकाच वेळी करू शकता ‘ग्रुप व्हॉईस कॉल’

Related Posts