IMPIMP

MP Navneet Rana | बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणात नवनीत राणा अडचणीत, अटक होणार?

by nagesh
Navneet Rana | shivdi court navneet rana father harbhajan singh was declared fugitive by the court

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइन   – बोगस जात प्रमाणपत्र (Fake Caste Certificate) सादर केल्याप्रकरणी अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता. याची शिवडी न्यायालयात सुनावणी सुरु होती. शिवडी न्यायालयाने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट (Non-Bailable Warrant) बजावले आहे. त्यामुळे नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना अटक होण्याची शक्यता आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अमरावती येथील नवनीत राणांचा (MP Navneet Rana) मतदार संघ अनुसुचित जातीच्या (Scheduled Castes) प्रवर्गासाठी राखीव करण्यात आला होता. राणा यांनी आपण अनुसुचित जातीतीलच आहोत असे सांगत आयोगाला जात प्रमाणपत्र सादर केले होते. आणि त्यांनी निवडणूक लढवत विजय मिळवला होता. मागील काळात त्यांच्या विरोधात आयोगाला बोगस जात प्रमाणपत्र सादर केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची शिवडी न्यायालयात सुनावणी झाली आहे. याबाबातचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

शिवडी न्यायालयाने फटकारताच राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयात (Bombay Sessions Court) दाद मागितली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने देखील या कारवाईला स्थगिती दिलेली नाही. शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. शिवडी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, पुढील सुनावणी 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे राणा यांच्यावरील कारवाई अटळ आहे. मुलुंड पोलीस राणा यांच्याविरोधात कारवाई करणार का, हे आगामी काळात पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ (Shivsena Former MP Anand Adsul) आणि सुनील भालेराव
(Sunil Bhalerao) यांनी राणा यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका
दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचे निरीक्षण नोंदविले होते.
तसेच त्यांचे जातप्रमाणपत्र रद्द करण्यात आले होते. त्यांना दोन लाखांचा दंड देखील ठोठावला होता.
राणा यांनी न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आव्हान केले होते.
सर्वोच्च न्यायालयाने 2021 साली या आदेशाला स्थगिती दिली होती.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  MP Navneet Rana | navneet rana will be arrested on a non bailable warrant

हे देखील वाचा :

India vs Pakistan | भारत- पाक सामन्यापूर्वी हा खेळाडू झाला जखमी, हॉस्पिटलमध्ये केले दाखल

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊत यांचा माध्यमांसोबत संपर्क टाळण्यासाठी पोलीस सावध

Pune Congress | चंद्रशेखर बावनकुळेंना पाठवणार ‘खुळखुळा’ दिवाळी भेट, काँग्रेस कार्यकर्ते म्हणाले – ‘ते राजकारणाला खेळ…’

Related Posts