IMPIMP

MP Rahul Shewale | युतीसाठी उद्धव ठाकरेंची PM नरेंद्र मोदींसोबत बंद दाराआड एक तास चर्चा, खासदार राहुल शेवाळेंचे गौप्यस्फोट

by nagesh
MP Rahul Shewale | shivsena mp rahul shewale maharashtra political uddhav thackeray pm narendra modi

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेना खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी भाजप-शिवसेना युतीबाबत (BJP-Shivsena Alliance) खूप मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) गेल्यावर्षी जून महिन्यात दिल्लीत पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीत युतीबाबत चर्चा झाली होती, असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी केला. तसेच आमदार फुटले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी खासदारांना माझ्याकडून युतीचे सर्व प्रयत्न करुन झाले आता तुम्ही करा, असं सांगितल्याचा मोठा दावा शेवाळे यांनी केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी केलेले गौप्यस्फोट

1. शिवसेना-भाजप युती व्हावी यासाठी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक तास चर्चा झाली.

2. युतीसाठी उद्धव ठाकरे तयार होते. त्यांनी मला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी युतीची चर्चा करायला सांगितले होते. पण नंतर उद्धव ठाकरे काहीही बोलले नाहीत.

3. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सर्व खासदारांना वर्षा बंगल्यावर बोलावलं. त्याठिकाणी ते म्हणाले की, जर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री (CM) बनवणार असतील तर आमदारांची भूमिका मान्य करायची माझी तयारी आहे. भाजपने तसा निर्णय घेतला तर मी त्या निर्णयाचं स्वागत करेन. त्यामुळे उद्धव ठाकरे भाजपसोबत जाण्यास तयार आहेत असंच सर्व खासदारांना वाटलं.

4. त्यानंतरच्या बैठकीत आपण मविआसोबत आहोत, एकत्र राहायला पाहिजे, एकत्र निवडणूक लढवली पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
मात्र खासदारांनी विरोध केला. भाजपसोबत युती करुन आपण निवडून आलो आहोत त्यामुळे आपण भाजप सोबत जावं असं मत खासदारांनी मांडलं.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

5. आम्ही भाजप सोबत युती मोडली, पण एनडीएमधून (NDA) बाहेर पडलो नाही. आम्ही तसं पत्र दिलं नाही.
आम्ही आजही एनडीएचा घटक आहोत.

6. आम्ही आता फक्त गटनेता बदलला आहे. भावना गवळी (MP Bhavana Gawli) या पहिल्यापासूनच प्रतोद आहेत.
त्यांचा व्हिप सर्व 18 खासदारांना लागू असेल.

Web Title :- MP Rahul Shewale | shivsena mp rahul shewale maharashtra political uddhav thackeray pm narendra modi

हे देखील वाचा :

MP Rahul Shewale | राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट; म्हणाले – ‘उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यानुसारच आम्ही…’

Eknath Shinde | बाळासाहेबांनी लिहिलेली शिवसेनेची घटना काय सांगते; CM एकनाथ शिंदेंना नुसते आमदार, खासदार पुरेसे नाहीत?

Uddhav Thackeray | बंडखोरांनी नाही तर भाजपने शिवसेनेत फूट पाडली, उद्धव ठाकरेंचा घणाघात

Related Posts