IMPIMP

MP Rahul Shewale | “उद्धव ठाकरे लोकसभेत विजय मिळवून देऊ शकत नाहीत” – शिवसेना खासदाराचं विधान

by nagesh
MP Rahul Shewale | uddhav thackeray not a face for 2024 lok sabha polls sena rebel mp rahul shewale

नवी दिल्ली : वृत्तसंस्था MP Rahul Shewale | शिवसेना आणि शिंदे गटाच्या राजकीय संघर्षामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. शिंदे यांच्या मोठ्या बंडाळीमुळे राज्यात सत्ताबदल झालं. त्यानंतर अनेक पदाधिकारी, आमदार, खासदार शिंदे गटात सामिल होत आहेत. शिंदे गटात गेलेले खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी आगामी लोकसभेच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

“2024 च्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे विजय मिळवून देऊ शकत नाहीत. त्यांनी भारतीय जनता पक्षाशी (BJP) युती करणे आवश्यक असल्याचं,” राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

त्यावेळी बोलताना राहूल शेवाळे म्हणाले, “शिवसेनेत फूट पडण्याआधी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या अनेक बैठकीत पुढील लोकसभा निवडणुकीत नेतृत्वाचा मुद्दा बंडखोर नेत्यांनी उपस्थित केला होता. त्या बैठकीत संजय राऊत यांनी ठाकरे यांच्याकडे इशारा केला होता. त्यावेळी, मी ठाकरे यांचा आदर करतो, मात्र आपण वास्तववादी असले पाहिजे, असे त्यांना सांगितले होते. उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा चेहरा असूच शकत नाहीत.”

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुढे ते म्हणाले, “अनेक मतदारसंघांमध्ये विरोधात असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस या
पक्षांशी शिवसेनेने युती करणे, हा अत्यंत गुंतागुंतीचा मामला आहे.
लोकसभा निवडणुकीत यूपीएचे नेते म्हणून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली
निवडणुका लढवणे हे आम्हाला कदापी मान्य होणारे नाहीये.’
तर, “शिवसेनेतील बहुसंख्य नेते भाजपशी युती करण्याच्या बाजूने आहेत आणि
त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली
निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे,” शेवाळे म्हणाले.

Web Title :- MP Rahul Shewale | uddhav thackeray not a face for 2024 lok sabha polls sena rebel mp rahul shewale

हे देखील वाचा :

NCRB Women Violence Report | NCRB : महिलांवरील लैंगिक अत्याचारात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर

Maharashtra Rains Update | राज्यात पावसाचा जोर कमी; पूरस्थिती भागातील नागरिकांना दिलासा, शेतीच्या कामांना गती

RBI करणार आहे मोठी घोषणा ! येथे जमा केलेल्या पैशावर मिळेल मोठा फायदा, जाणून घ्या कसा

Related Posts