IMPIMP

MP Rajendra Gavit | ‘राष्ट्रपती निवडणुकीत भाजपला पाठींबा द्या’; शिवसेनेच्या ‘या’ खासदारांचे उद्धव ठाकरेंना पत्र

by nagesh
MP Rajendra Gavit | shiv sena mp rajendra gavit write letter to uddhav thackeray over draupadi murmu

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MP Rajendra Gavit | गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत (Shivsena) धक्कातंत्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्याने राज्यात सत्तांतर झालं आहे. नुकतंच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Election 2022) भाजपने (BJP) द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान या निवडणुकीमध्ये भाजपला पाठींबा द्या, अशी मागणी काही शिवसेना खासदारांकडून केली जात आहे. मुंबईतील खासदार राहुल शेवाळे (MP Rahul Shewale) यांच्यानंतर आता पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनीही राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठींबा देण्याची मागणी केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

खासदार राजेंद्र गावित (MP Rajendra Gavit) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना याबाबत मागणीचे पत्र दिले आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भूमिका घेण्याबाबत शिवसेनेवर दबाव वाढला असल्याचे बोलले जात आहे. या दरम्यान आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार ? हे पाहावे लागेल.

येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होत असून, शिवसेनेने या निवडणुकीत आपले समर्थन कुणाला असेल, हे अद्याप अस्पष्ट आहे.
द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील महिला आहेत.
त्यांच्या निमित्ताने आदिवासी समाजाला देशाच्या सर्वोच्च पदावर जाण्याचा बहुमान मिळणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वी महाराष्ट्राच्या कन्या प्रतिभाताई पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रणव मुखर्जी यांना पाठींबा दिला होता, याकडे लक्ष वेधत खासदार गावित यांनी मुर्मू यांना पाठींबा देण्याची विनंती उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

Web Title :- MP Rajendra Gavit | shiv sena mp rajendra gavit write letter to uddhav thackeray over draupadi murmu

हे देखील वाचा :

Vasant More | ‘हिंमत असेल तर महापौर जनतेतून निवडून आणा’ – मनसे नेते वसंत मोरे

Chhagan Bhujbal | …म्हणून अनेकजण शिवसेनेतून भाजपात गेले – छगन भुजबळ

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले – “गाफील न राहता नव्या चिन्हाची तयारी ठेवा”

Related Posts