IMPIMP

MP Sanjay Raut | शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांची हकालपट्टी, ‘या’ ज्येष्ठ नेत्याची नेतेपदी निवड

by nagesh
 Maharashtra Politics News | ncp-leader-chhagan-bhujbal-has-criticized-thackeray-group- leader-mp-sanjay-raut for saamana editorial

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन (Parliamentary Leader of Shiv Sena) ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर संसदीय नेतेपदी खासदार गजानन किर्तीकर (MP Gajanan Kirtikar) यांची निवड करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून महिती दिली. संजय राऊतांना (MP Sanjay Raut) संसदीय नेतेपदावरुन हटवून शिंदे यांनी ठाकरे गटला मोठा धक्का दिला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गटातील (Thackeray Group) ) संघर्ष टोकला गेला आहे. यातच निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) शिंदे गटाला दिल्याने यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयावरुन ठाकरे गट आक्रमक झाला असून खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हे सातत्याने शिंदे गटावर हल्लाबोल करत आहेत. यावरुन शिंदे गटाच्या आमदारांनी पलटवार करताना राऊतांनी आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर आमच्यावर टीका करावी असे म्हटले आहे. त्यातच आता संजय राऊतांची संसदीय नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

लोकसभेतील 18 पैकी 13 खासदार शिंदे गटात सामिल झाले आहेत.
त्यामुळे शिंदे गटाकडून संसदेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी खासदार राहुल शेवाळे
(Group Leader MP Rahul Shewale) यांची यापूर्वीच नियुक्ती केली आहे.
आता खासदार संजय राऊत यांना शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदावरुन हकालपट्टी केली असून त्यांच्या
जागी ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती केली आहे.
दरम्यान यासंदर्भात काही दिवसांपूर्वीच राहुल शेवाळे यांनी पत्रकारांना तशी माहिती दिली होती.
त्यानुसार, गुरुवारी ही निवड करण्यात आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  MP Sanjay Raut | the ouster of sanjay raut from the post of parliamentary leader of shivsena given the responsibility to gajanan kirtikar

हे देखील वाचा :

IPL 2023 | यंदाच्या आयपीएलच्या नियमांत होणार मोठे बदल; जाणून घ्या नवीन नियमांबद्दल

Pune Aam Aadmi Party (AAP) Letter To Chandrakant Patil | पुणे : आम आदमी पार्टीकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना खुले पत्र, ‘आप’ म्हणतंय – ‘दादा, पुण्यातील विक्रम – वेताळ खेळ थांबवा !’

Zwigato Movie Tax Free | कपिल शर्माच्या ‘झ्विगाटो’ चित्रपटाला ‘या’ राज्याने केला टॅक्स फ्री; दिग्दर्शिकेने ट्वीट करून दिली माहिती

Related Posts