IMPIMP

MP Supriya Sule | ‘इन्कम टॅक्स’च्या छाप्यानंतर खा. सुप्रिया सुळे बोलेल्या, म्हणाल्या – ‘संघर्ष करणं पवारांची खासियत, महाराष्ट्र दिल्ली पुढं झुकणार नाही’

by nagesh
Supriya Sule | NCP leader and MP surpriya sule inflation yesterday today kashmiri pandit supriya sule again in the lok sabha

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइन MP Supriya Sule | आयकर विभागाने गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांसोबतच बहिणींच्या घरांवर व त्यांच्या कार्यालयावर धाड टाकली. या धाडींमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. अजित पवारांच्या बहिणींच्या घरी अद्यापही आयकर विभाग (Income Tax Department) चौकशी करत असून मुंबईतील पार्थ पवार यांच्या कार्यालयाची आयकर विभाग झाडाझडती घेत आहे. या सर्व प्रकारावर आता ठाण्यात नवरात्री उत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. सघर्ष करणं ही पवारांची खासियत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सुळे म्हणाल्या, आमचे एकत्रित कुटुंब आहे. ते केवळ दादांचे नातेवाईक नाही तर ते आमचेही नातेवाईक आहेत. दिल्लीने कितीही त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री झुकणार नाही आणि कधी झुकलाही नाही. आम्ही कधी सुडाचे राजकारण केले नाही आणि करणार नाही. संघर्ष करणं ही पवारांची खासियत आहे, असे त्यांनी (MP Supriya Sule) म्हंटले.

साखर कारखान्याच्या संदर्भात गुरुवारी आयकर विभागाने जवाहरालाल छाजेड, मुकेश बग्रेचा, राजेंद्र घाडगे, सचिन शिनगारे, वीरधवल जगदाळे यांच्याकडे धाडी पडल्या होत्या. सचिन शिनगारे, विरधवल जगदाळे, राजेंद्र घाडगे, जरंडेश्वर, दौंड शुगर, जरंडेश्वर,आणि अंबालिका येथे आलटून पालटून डायरेक्टर होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आयकर विभागाच्या धाडसत्रावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, वेगवेगळ्या घरात पाहुणे असून त्यांचं काम सुुरु आहे. ते गेल्यावर मला काय बोलयच आहे, माझी काय भूमिका आहे ते मी मांडेण. घाबरायच काही एक कारण नाही जे नियमाने असेल ते नजतेच्या समोर येईल.

आयकर विभागाने गुरुवारी धाडी टाकल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया देताना कुणावर छापे मारायचे हा आयकर विभागाचा अधिकार असतो.
त्यांना काही शंका असतील तर ते छापे टाकू शकतात. माझ्याशी संबंधित असणाऱ्या काही कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. आम्ही दरवर्षी टॅक्स भरतो.
मी अर्थमंत्री असल्याने व्यवस्थित टॅक्स कसा भरायचा हे मला चांगलंच माहित आहे. त्यात कुठलीही अडचण नाही, असेही त्यांनी म्हंटले होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

राजकीय हेतूने ही धाड टाकण्यात आली की त्यांना आणखी काही माहिती हवी होती हे आयकर विभागाचे अधिकारीच सांगू शकतात.
मला फक्त एकाच गोष्टीच दु:ख वाटत की ३५-४० वर्षापूर्वी माझ्या बहिणींच लग्न झाला.
त्या त्यांच्या घरी सुखी संसार करत आहेत. त्यापैकी कोल्हापूर आणि पुण्यातील
दोन बहिणींच्या कार्यालयावर आयकरने धाड टाकण्याचे कारण मात्र समजले नाही,
असेही अजित पवार म्हणाले.

Web Title :- MP Supriya Sule | after the ‘income tax’ raid Supriya Sule said, “Struggling is Pawar’s specialty. Maharashtra will not bow down to Delhi.”

हे देखील वाचा :

Cyber Crime News | धक्कादायक ! 19 वर्षाच्या पोराकडून तब्बल 50 हून अधिक शिक्षीका अन् मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त, पुढं झालं असं काही…

Nilesh Rane | ‘साखरेच्या नावावर महाराष्ट्राला लुटलं, तिच साखर पवार कुटुंबाला संपवणार’, निलेश राणेंची टीका

Shalini Patil | जरंडेश्वरच्या व्यवहारावरून शालिनी पाटलांचा घणाघात, म्हणाल्या – ‘अजित पवार खोटं बोलतात, सत्य वेगळंच’

Related Posts