IMPIMP

MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला; म्हणाल्या – ‘आणखी एक तारीख पाहू’

by nagesh
Maharashtra Cabinet Expansion | deputy cm devendra fadnavis first reaction on cabinet expansion and sanjay rathod oath

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइनविधान परिषद निवडणुकीनंतर (Vidhan Parishad Election) महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळेल असा दावा भाजपने (BJP) काल केला होता. मात्र, भाजपच्या दाव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी पलटवार केला आहे. अडीच वर्षे त्यांनी खूप तारखा दिल्या आणखी एक तारीख पाहू, असा टोला सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी भाजपला लगावला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अमरावती येथील अंबादेवी मंदिरात (Ambadevi Temple Amravati) दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) म्हणाल्या, महाराष्ट्रात आघाडीचे सरकार आल्यापासून सरकार पडणार असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. या गोष्टीला आज अडीच वर्षे झाली. मात्र, सत्ता काही पडलेली नाही. तरीही विरोधकांची सरकार बाबतची भविष्यवाणी काही केल्या संपलेली नाही. पण महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे. असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

हे दडपशाहीचे सरकार
काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना ईडीने (ED) नोटीस बजावले आहे. यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, हे दडपशाहीचे सरकार आहे, विरोधात बोलणाऱ्या लोकांवर अशा पद्धतीने कारवाई करण्याचे काम भाजप सरकारच्या काळात गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे.

पंतप्रधानांच्या घोषणेचे स्वागत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येत्या दीड वर्षात दहा लाख शासकीय नोकऱ्या (Government Jobs) देण्याची घोषणा केली आहे.
देशातील नव्या पिढीला नोकऱ्या मिळणार असतील तर या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करते, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- MP Supriya Sule | NCP leader and MP supriya sule attack on bjp in amravati

हे देखील वाचा :

PM Narendra Modi Visit Dehu | दौरा PM मोदींचा अन् चर्चा अजित पवारांची, विमानतळावरील ‘तो’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल

PM Narendra Modi | देहूतील कार्यक्रमात अजित पवार भाषणापासून ‘वंचित’, PM मोदीही म्हणाले – ‘दादांना बोलू द्या’; जाणून घ्या नेमकं काय घडलं ?

Supriya Sule | PM मोदींच्या ‘त्या’ निर्णयावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Related Posts