IMPIMP

MP Supriya Sule | ‘मोदी सरकार संविधान बदलू पाहतंय; भाजपला जोरदार विरोध करा, तरच देश वाचेल’

by nagesh
MP Supriya Sule | 'BJP and Shinde group's stance on Dhangar reservation is twofold, center should clarify' - Khat. Supriya Sule

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  MP Supriya Sule | 26 नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त (Constitution Day) आज केंद्र सरकारने (Modi Government) संसदेत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परंतु, सरकारचा निषेध करत विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सामाजिक न्याय विभागाने प्रदेश कार्यालयात संविधान गौरव दिन (Constitution Pride Day) विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) म्हणाल्या, ‘मोदी सरकार (Modi government) संविधान बदलू पाहत असून, भाजपला (BJP) जोरदार विरोध करा.
तरच देश वाचेल,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे. ‘संविधान जात, धर्म किंवा प्रांत नाही. तो एक ग्रंथरूपातला कष्टपूर्वक घडवलेला मार्गदर्शक आहे.
पण, आता केंद्रातील सत्ताधारी हे संविधान बदलू पाहात आहेत.
त्यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रयत्न याच दिशेने सुरू आहेत. आपली जी काही ओळख आहे, ती संविधानामुळे आहे.
त्यामुळे संविधानात जर कुणी बदल करत असेल तर त्याचा कडाडून विरोध आपल्याला करायला हवा.
संविधान वाचलं तरच देश वाचेल.’ असं त्या म्हणाल्या.

पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘या देशातल्या सर्वसामान्य माणसाला ज्या संविधानाने ताकद दिली त्या संविधानाचा सन्मान आपल्याला टिकवायचा आहे.
या संविधानाने ही ताकद आपल्याला दिली म्हणूनच संयुक्त किसान मोर्चातल्या शेतकऱ्यांचा लढा यशस्वी झाला आणि केंद्र सरकारला (Modi government) कृषी कायदे मागे घ्यावे लागले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दरम्यान, ‘संविधानाच्या संरक्षणासाठी आपण उभे राहिले पाहिजे. अगदी मोठे आंदोलन जरी प्रत्येकाला शक्य झाले नाही.
तरी आपल्या पातळीवर आपण छोट्या-छोट्या गोष्टी करून संविधानाबद्दलच्या जाणिवांबाबत जागर करू शकतो.
पुढील पिढ्यांमध्ये संविधानाचे महत्त्व वाढत राहील, याची काळजी आपणच घ्यायला हवी.
संविधानाच्या बळकटीसाठीच आपण आपली संघटना वाढवत राहूया आणि त्याद्वारे सामाजिक बांधिलकी जपत राहूया,’
असं आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

Web Title : MP Supriya Sule | ncp mp supriya sule criticized centre modi govt and bjp ncp constitution day

हे देखील वाचा :

Pune Crime | मारहाणीचा जाब विचारणाऱ्या तरुणांवर प्राणघातक हल्ला, विमानतळ पोलिसांकडून 4 जणांना अटक

Shreyas Iyer | सुनिल गावसकरांकडून कॅप घेणार्‍या श्रेयसनं पदार्पणाच्या कसोटीत केली त्यांच्या मेव्हण्याची बरोबरी, जाणून घ्या नेमकं काय केलं

नोव्हेंबरमध्येच नोकरदार आणि Pensioner ने उरकून घ्यावीत ‘ही’ सर्वात महत्वाची कामे, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

Related Posts