IMPIMP

MP Udayanraje Bhosale | तुम्ही म्हणता आम्ही केले मग दाखवा काय केले, उदयनराजेंचा आमदार शिवेंद्रराजेंवर पलटवार

by nagesh
Udyanraje Bhosale | BJP MP udyanraje bhosale criticize bhagatsinh koshayari over chatrapati shivaji maharaj

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन – खा. उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendraraje Bhosale) यांच्यातील वाद सगळ्यांना माहित आहे. सध्या हे दोघे एकाच पक्षात असले तरी त्यांच्यातील अंतर्गत वाद अधूनमधून समोर येत असतो. हे दोन्ही राजे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता ग्रेडसेपरेटरवरून खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर टीका करत निशाणा साधला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काय म्हणाले उदयनराजे?



पैसे खाणार्‍या त्या उच्चशिक्षित लोकांना आपल्या आयुष्यात पैसे खाण्यापलीकडे काय माहित नाही, त्यांना ग्रेडसेपरेटरचे (Gradeseparator) काय कळणार? वैयक्तिक टीका करणे त्या लोकांचा गुणधर्म आहे. आम्ही ग्रेडसेपरेटरमध्ये काय पैसे खाल्ले हे दाखवा? कुठे पैसे खाल्ले? आम्हाला खायची सवय नाही तर काम करायची सवय आहे, अशी टीका खा. उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी केली आहे. आ. शिवेंद्रराजे यांनी बनकर एजन्सीने (Bunker Agency) ग्रेडसेपरेटरचा सर्व्हे केला आहे का? अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना उदयनराजेंनी हि टीका केली आहे.

तसेच पैसे खाणार्‍या त्या उच्चशिक्षित लोकांना आयुष्यात पैसे खाण्यापलीकडे काय माहित असणार,
त्यांना ग्रेडसेपरेटरचे काय कळणार? अशी टीकादेखील त्यांनी केली.
नक्की ट्राफिक कुठे आहे हे बघण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन थांबा.
वाहनांच्या संख्येत वाढ झाली असून त्यांना ती वाढ झाली आहे असे वाटत नाही.
तहान लागल्यावर विहीर खोदणार का? असा सवाल करत तुम्ही म्हणता आम्ही केले मग दाखवा काय केले ते.
असा आव्हानदेखील उदयनराजेंनी यावेळी दिले.

Web Title :- MP Udayanraje Bhosale | You say we did, then show us what we did, Udayanraje’s MLA Shivendraraj’s counter attack

हे देखील वाचा :

Amruta Fadnavis | CM शिंदे धमकी प्रकरणाच्या टीकेला अमृता फडणवीसांचे प्रत्युत्तर; यशोमती ठाकूरांना म्हणाल्या – वेगळा दिमाख असणार्‍या…

Devendra Fadnavis | वेदांता-फॉक्सकॉनच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस निरूत्तर, महत्वाचा प्रश्न असूनही म्हणाले – ‘दररोज तीच कॅसेट वाजवताय’, जरा…

Dasara Melava 2022 | दसरा मेळाव्यासाठी मुंबई पोलिसांचा विशेष प्लॅन, ‘या’ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची केली नियुक्ती

Related Posts