IMPIMP

MPSC परीक्षेतून होणारा भाजपचा प्रचार थांबवा : यशोमती ठाकूर

by bali123
mpsc exam 2021 congress yashomati thakur demands bjp campaign mpsc exam should be stopped

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षेत भाजपचा प्रचार होत असल्याचे राज्याच्या महिला व बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर yashomati thakur यांनी म्हटले आहे. तसेच भाजप धार्जिणा प्रचार रोखावा आणि अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली असून, त्यांना निवेदन दिले आहे.

UPA चं नेतृत्व शरद पवारांनी करावं?, बाळासाहेब थोरात म्हणाले…

यशोमती ठाकूर yashomati thakur  यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीचे फोटो ट्विटरवरही शेअर केले आहेत. त्यामध्ये केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले, की ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत होणारा भाजप धार्जिणा प्रचार रोखावा आणि अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी मी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली आहे’. दरवर्षी लाखो विद्यार्थी MPSC परीक्षेला बसतात. गेल्या परीक्षेत मनुस्मृतीसंदर्भात वादग्रस्त प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी संबंधित अभ्यासक्रम जाणीवपू्र्वक रुजवण्यात येत असल्याची टीका ठाकूर यांनी केली आहे. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली.

पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने शरद पवारांना पुन्हा ब्रीज कँडीत दाखल

दरम्यान, काँग्रेसने ब्रिटिश शिक्षण पद्धती निवडली, असा तथ्यहीन आरोप असलेला उतारा जाणीवपूर्वक समाविष्ट करण्यात आला. यातून काँग्रेसची बदनामी करण्याचा स्पष्ट हेतू दिसून येत आहे, असेही ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवदेनात म्हटले आहे.

Also Read:

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

‘संसाधने तसेच लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का ?’, मनसेचा Lockdown ला विरोध, ठाकरे सरकारवर साधला ‘निशाणा’

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

Related Posts

Leave a Comment