IMPIMP

MPSC | न्यायालयाच्या सुनावणीचे कारण देत पुन्हा 416 उमेदवारांच्या नियुक्तीस विलंब

by nagesh
MPSC | mpsc court hearing reason 416 candidate posting pending in maharashtra

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन MPSC | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा परीक्षेतून निवड झालेल्या 416 उमेदवारांच्या नियुक्त्या मागील दीड वर्षापासून रखडल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची सही झाल्यानंतर 416 उमेदवारांच्या नियुक्त्या तात्काळ करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी दिले होते. मात्र, सामनाय प्रशासनाकडून कोरोना, मराठा आरक्षण (Maratha reservation), कागदपत्रे पडताळणी, निवडणूक आचारसंहिता (Election Code of Conduct) आणि आता कोर्टात केस सुरु असल्याचे कारण देत नियुक्त्या रखडवल्या आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

सामान्य प्रशासनाकडून होणारी ही दिरंगाई प्रधान सचिव सुजाता सौनिक (Sujata Sounik) यांच्यामुळे होत आहे, असा आरोप आता उमेदवारांकडून केला जात आहे. तसेच आमच्यातील एखादा स्वप्नील लोणकर (Swapnil Lonakar) झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा परखड सवाल देखील उमेदवारांनी प्रशासनाला केला आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यमंत्र्यांनी आदेश देऊनही सौनिक यांनी उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी चालू आहे, विधान परिषदेची निवडणूक आचारसंहिता लागू आहे, अशी कारणे देत नियुक्ती (posting pending) देण्यास नकार दिला होता. परंतु निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर आता कोर्टात या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत केस सुरु असल्याने आम्ही नियुक्त्या देऊ शकत नाही, असे कारण देऊन सामान्य प्रशासनाकडून नियुक्त्यांमध्ये चालढकलपणा केला जात आहे. (MPSC)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

सामान्य प्रशासनाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक या हेकड आणि कोणत्याही फाईलच्या अंमलबजावणीस उशीर लावतात, त्यामुळे त्यांच्याबाबत संपूर्ण मंत्रालयात नकारात्मकता असल्याचे एका मंत्र्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.

नायब तहसीलदार झालेल्या एकाने सांगितले की, कोर्टात फक्त दोन मुलांनी मराठा आरक्षण कॅन्सल झाल्यानंतर पदात बदल झाल्यामुळे याचिका दाखल केली आहे.
याची सुनावणी सुरु असून निकाल कधी लागेल सांगता येत नाही.
या दोघांमुळे इतरांना तुम्ही बाहेर ठेवणार आहात का? यापूर्वीच्या बॅचेसला अशा कोर्टाच्या सुनावणीला सामोरे जावे लागले होते.
परंतु कधीही नियुक्त्या रोखल्या नाहीत. नियुक्त्या रोखण्यासाठी प्रशासन कारणे शोधत आहे.

याप्रकरणी सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की,
कोर्टात केस चालू असल्याने नियुक्ती देण्यास उशीर होतोय, मात्र हे प्रकरण काही जास्त किचकट नाही.
त्यामुळे लवकरात लवकर आम्ही उमेदवारांना नियुक्त्या देणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

Web Title :- MPSC | mpsc court hearing reason 416 candidate posting pending in maharashtra

हे देखील वाचा :

HM Amit Shah Pune Visit | गृहमंत्री अमित शाह रविवारी पुणे महापालिकेत ! महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Small Saving Schemes | ‘या’ सरकारी योजनांकडून लोकांची अपेक्षा भंग, पोस्ट ऑफिसमध्ये पण डिपॉजिट घटले

Supreme Court | ‘सेक्स वर्कर्सना त्वरीत रेशन, आधार आणि मतदान कार्ड द्या’, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Related Posts