IMPIMP

MSRTC Privatization | महाराष्ट्र एसटी महामंडळाचे उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खासगीकरण?

by nagesh
ST Workers Strike | MSRTC employees start returning to work 15185 employees attend in one day

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MSRTC Privatization | गेल्या काही दिवसापासून एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण करावे यासाठी कर्मचाऱ्यांनी संप (ST Workers Strike) पुकारला आहे. तर सरकारनेही कठोर भूमिका घेत निलंबनाची कारवाई सुरु केली आहे. त्यातच आता आर्थिक संकटातून एसटी महामंडळाला बाहेर काढण्याबाबतचा सल्ला देण्यासाठी महामंडळाने केपीएमजी संस्थेची नेमणूक केली आहे. त्यामुळे आता उत्पन्नाचे अन्य मार्ग शोधायचे की खासगीकरण करायचे याचा सल्ला ही संस्था देईल. त्यानंतर पावले उचलली जाणार असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (MSRTC Privatization)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी राज्य सरकारची (Maharashtra Government) मदत घ्यावी लागत असून महामंडळाचा संचित तोटा १२ हजार कोटींवर पोहोचला आहे. २९० कोटींच्या आसपास उत्त्पन्न असले तरी वेतनासाठी ३९० कोटी, डिझेलसाठी २९२ कोटींचा खर्च येतो. शिवाय टायर, देखभाल-दुरुस्तीसह इतर खर्चाचा भारही आहे. दरम्यान, महामंडळाने महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता वाढवला आहे. त्यामुळे वेतनाचा खर्च वाढेल. एकूणच खर्च आणि उत्पन्नाची सांगड घालण्यासाठी केपीएमजी या खासगी संस्थेचा सल्ला महामंडळ घेणार आहे. हि समिती विविध मुद्द्यांवर विचार करणार आहे. यामध्ये महामंडळातील नेमक्या कोणत्या सेवांचे खासगीकरण करायचे, चालक-वाहक आपलेच ठेवून बस भाड्याने घ्यायच्या का?, सध्याच्या बसचे काय करायचे?, इलेक्ट्रिक बस खरेदीचे काय?, आधुनिकीकरणाची जोड, तंत्रज्ञानाचा वापर अशा अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. (MSRTC Privatization)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

असा आहे उत्तर प्रदेश पॅटर्न

एसटी महामंडळाच्या (MSRTC) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील परिवहन मंडळांचा विचार केला तर उत्तर प्रदेशचे परिवहन मंडळ फायद्यात आहे. सध्या देशात ७३ परिवहन मंडळे आणि संस्था तोट्यात आहेत. उत्तर प्रदेशमध्ये गाड्या खरेदीवर पैसे न घालवता खासगी गाड्या भाड्याने घेतल्या जातात. राज्यात गाड्यांच्या तुलनेत कर्मचारी संख्या अधिक आहे. गाड्या वाढवायच्या झाल्यास एका गाडीमागे किमान ५० लाखांचा खर्च, दुरुस्ती-देखभाल, डिझेल असे अनेक खर्च वाढत जातात. त्या तुलनेत उत्तर प्रदेश पॅटर्न फायदेशीर आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले की, एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी काही पावले उचलण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केपीएमजी संस्थेची नेमणूक केली जाणार आहे. ही संस्था अभ्यास करून पर्याय सुचवेल. त्यासाठी त्यानं लवकरात लवकर अहवाल देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Web Title :- MSRTC Privatization | MSRTC privatization st lines uttar pradesh st workers strike in maharashtra

हे देखील वाचा :

Sameer Wankhede | मलिकांच्या ‘त्या’ आरोपावरुन वानखेडेंचं प्रत्युत्तर; म्हणाले – ‘वाशीमधील ‘त्या’ बारचे मालक आपणच, ‘मी 2006 पासूनच…’

Supreme Court | CBSE, ICSE बोर्डाच्या परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय; SC नं विद्यार्थ्यांची रिट याचिका फेटाळली

Mumbai Crime | राजकीय नेत्यांनी पैसे बुडवल्याने कॅटरिंग व्यावसायिकाची आत्महत्या; परिसरात प्रचंड खळबळ

Related Posts