IMPIMP

Mukesh Ambani Bomb Scare : तिहार जेलमधील दहशतवादी तहसीन अख्तरकडून मोबाईल हस्तगत

by pranjalishirish
mukesh-ambani-bomb-scare-mobile-seized-terrorist-tehseen-akhtar-in-tihar-jail

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उद्योगपती मुकेश अंबानी Mukesh Ambani यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारी रोजी एक स्कॉर्पिओ कार सापडली होती. यामध्ये 20 जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र सापडले होते. यानंतर अंबानींच्या मोबाईलवर धमकीचा टेलिग्राम मेसेज आला होता. हा मेसेज दिल्लीतील तिहार जेलमधून आल्याचे तपासात समोर आले. यानंतर गुरुवारी सायंकाळी 6 ते 9 पर्यंत छापेमारी करण्यात आली. यामध्ये खतरनाक दहशतवादी तहसीन अख्तरच्या बराकीतून मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

मुकेश अंबानी Mukesh Ambani यांना मेसेज आल्यानंतर याचा तपास सरू करण्यात आला होता. सुरक्षारक्षकांनी जेल नंबर -8 मध्ये छापा टाकला. इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी तहसीनच्या बराकीमधून एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. याच मोबाईलवरून टेलिग्राम चॅनेल अॅक्टिव्हेट करण्यात आले होते. तहसीन अख्तर हा पटनाच्या गांधी मैदानातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत बॉम्बस्फोट, हैदराबाद बॉम्बस्फोट आणि बोधगया बॉम्बस्फोटामध्ये सहभागी होता.

सुरक्षारक्षकांनी तहसीन याच्याकडून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये टोर ब्राऊजरद्वारे व्हर्च्युअल नंबर बनवण्यात आले होते. याच नंबरवरून टेलिग्राम अकाउंट बनवण्यात आले होते. त्यानंतर धमक्यांचे पोस्टर तयार करून ते पाठवण्यात आले होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल तहसीन अख्तरला रिमांडवर घेऊ चौकशी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, आणखी एक मोबाईल नंबर पोलिसांच्या रडावर आहे. मात्र, हा नंबर सप्टेंबरमध्ये अॅक्टिव्हेट केल्यानंतर तो नंबर बंद करण्यात आला.

बनावट कागदपत्रांच्या आधारे हे दोन्ही नंबर घेण्यात आले असून, हे नंबर तिहार जेलमधील गुन्हेगारांसाठी खरेदी करण्यात आल्याचे तपासात समोर आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, अंबानी  Mukesh Ambani यांच्या घराबाहेर स्फोटकाची कार सापडल्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी टेलिग्राम चॅनेल तयार करण्यात आले. 27 फेब्रुवारी रोजी अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली गाडी ठेवण्याची जबाबदारी घेणारा मेसेज अंबानीच्या टेलिग्रामवर पाठवण्यात आला. या मेसेजमध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये पैसे पाठवण्याची मागणी करण्यात आली होती. ही रक्कम जमा करण्यासाठी लिंक देण्यात आली होती. चौकशीदरम्यान ती लिंक उपलब्ध नाही असे आढळले. त्यामुळे त्रास देण्यासाठी कोणीतरी असे कृत्य करत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

अंबानी Mukesh Ambani यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आल्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी जैश-उल-हिंदचा आणखी एक मेसेज सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आला. घराबाहेर सापडलेल्या गाडी प्रकरणात आपली कोणतीही भूमिका नसल्याचा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला. या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेने केला होता. त्यानंतर गृहमंत्रालयाने हा तपास एटीएसकडे सोपवला. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास एटीएसकडून केंद्रीय तपास यंत्रणा एनआयएकडे सोपवण्यात आला.

Alos Read :

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

Related Posts