IMPIMP

Mukhtar Abbas Naqvi | मुख्तार अब्बास नक्वींचा केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा, उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी मिळणार ?

by nagesh
  Mukhtar Abbas Naqvi | union ministers mukhtar abbas naqvi rcp singh resign from pm modi cabinet vice presidential elections on cards

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनपंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मंत्रिमंडळातील (Cabinet) लोकप्रिय चेहरा असलेले केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas Naqvi) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते अल्पसंख्याक मंत्री होते. नक्वी (Mukhtar Abbas Naqvi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर राजीनामा (Resignation) दिला. त्यांनी आज त्यांच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी मंत्री म्हणून नक्वी यांच्या योगदानाचे कौतुक केले. याशिवाय स्टील मंत्री आरसीपी सिंह (Steel Minister RCP Singh) यांनीही आज शेवटची कॅबिनेट बैठक झाल्यावर पदाचा राजीनामा दिला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पंतप्रधान मोदींनी दोन्ही केंद्रीय मंत्र्यांना निरोप देताना सांगितले की, या दोघांनी मंत्री असताना देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. या दोन्ही मंत्र्याचा राज्य सभेचा (Rajya Sabha) कार्यकाळ 7 जुलै रोजी संपत आहे. मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas Naqvi) हे राज्यसभेचे सदस्य होते. त्यांचा कार्यकाळ गुरुवारी संपत आहे. यावेळी भाजपने (BJP) नक्वी यांना राज्यसभेवर पाठवले नाही. त्यामुळे पक्षाकडून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असे मानले जाते. तसेच उपराष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत (Vice Presidential Election) मुख्तार अब्बास नक्वी हे भाजपचे उमेदवार असू शकतात अशी चर्चा आहे.

नक्वी यांच्यासह मंत्रिमंडळातील जेडीयू कोट्यातील मंत्री आरसीपी सिंह यांचा कार्यकाळ ही गुरुवारी संपत आहे.
हे दोन्ही नेते 6 जुलैनंतर कोणत्याही सभागृहाचे सदस्य असणार नाहीत.
ते खासदार (MP) न होता सहा महिने मंत्री राहू शकतात, पण त्याआधीच त्यांनी मंत्रिमंडळाचा निरोप घेतला.

दरम्यान, दोघांच्या भविष्याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
नक्वी यांना उपराष्ट्रपतीपद ते राज्यपाल (Governor) किंवा राज्यांचे नायब राज्यपालपद (Deputy Governor) दिले जाण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे, आरसीपी सिंह हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  Mukhtar Abbas Naqvi | union ministers mukhtar abbas naqvi rcp singh resign from pm modi cabinet vice presidential elections on cards

हे देखील वाचा :

Pune Crime | पेट्रोल व डिझेल चोरी करणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड, 81 लाखाचा मुद्देमाल जप्त

Pune Rain | 2 दिवसांच्या पावसांतच शहरातील वाहतूक कोलमडली; वाहतूक पोलिस आणि पालिकेमध्ये समन्वयचा अभाव, फटका मात्र पुणेकरांना

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार शिवराज शिंदे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 86 वी कारवाई

Related Posts