IMPIMP

Mumbai Crime | राजकीय नेत्यांनी पैसे बुडवल्याने कॅटरिंग व्यावसायिकाची आत्महत्या; परिसरात प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime | Fed up with harassment a married woman jumps off a terrace and commits suicide Incidents in Katraj area

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Mumbai Crime | मुंबईमधील चेंबूर (Chembur) या ठिकाणी राजकीय नेत्यांनी पैसे बुडवल्याने एका कॅटरिंग व्यावसायिकाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. या व्यावसायिकाने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोटसुद्धा (Suicide Note) लिहिली होती. त्याने सुसाईड नोटमध्ये आत्महत्येसाठी कारणीभूत असलेल्या लोकांची नावं लिहिली आहे.या प्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात (Govandi Police Station) गुन्हा (Mumbai Crime) दाखल करण्यात आला असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

प्रकाश राठोड (Prakash Rathod) असे आत्महत्या (Mumbai Crime) करणाऱ्या कॅटरिंग व्यावसायिकाचं नाव आहे. ते चेंबूरमधील पांजरापोळ परिसरातील रहिवासी होते. मृत राठोड यांचा कॅटरिंगचा व्यवसाय असून ते देवनार, चेंबूर आणि गोवंडी परिसरात विविध कार्यक्रमासाठी जेवण पुरवण्याचं काम करत होते. संबंधित परिसरातील काही बड्या राजकीय नेत्यांनी त्यांच्याकडून अनेकदा जेवणाची ऑर्डर घेतली होती. पण जेवणाचे लाखो रुपयाचं बिल त्यांनी थकवले होते. यामुळे प्रकाश राठोड हे कर्जबाजारी (Debt bondage) झाले होते.

या राजकीय नेत्यांना बिलाबाबत अनेकदा विनवणी करूनही ते पैसे देण्यास टाळाटाळ करत होते.
त्यामुळे राजकीय नेत्यांच्या मुजोरीला कंटाळून प्रकाश राठोड यांनी देवनार (Devnar) येथील एका हॉलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Mumbai Crime) केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच गोवंडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता प्रकाश राठोड यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट त्यांना सापडली.
या नोटमध्ये त्यांनी आत्महत्येसाठी कारणीभूत असलेल्या लोकांची नावं लिहिली आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (Mumbai Crime) दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Mumbai Crime | political leaders not paid for event meal payment catering businessman commits suicide in mumbai Govandi Police Station area

हे देखील वाचा :

LIC Jeevan Pragati Scheme | रोज 200 रुपये वाचवल्यास होईल 28 लाखांचा फायदा, जाणून घ्या LIC च्या ‘या’ योजनेची वैशिष्ट्ये

Vikram Gokhale | ‘त्या’ मुलीची अन् माझी ओळख नाही, पण…’ – विक्रम गोखले

Chandrakant Patil | ‘कृषी कायदे पुन्हा आणण्यासाठी मी मोदींना विनंती करणार’ – चंद्रकांत पाटील

Related Posts