IMPIMP

Mumbai Cruise Drugs Case | अभिनेता शाहरुख खानच्या मॅनेजर ‘पूजा ददलानी’ यांना मुंबई पोलिसांकडून समन्स

by nagesh
Mumbai Cruise Drugs Case | mumbai police summons to pooja dadlani mumbai police summons shah rukh khan s manager pooja dadlani

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Mumbai Cruise Drugs Case | मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला ( Mumbai Cruise Drugs Case) एक वेगळं वळण लागलं आहे. या प्रकरणी एनसीबी, मुंबई पोलिस आणि एनसीबीची एसआयटीदेखील चौकशीस उतरले आहेत. दरम्यान, याप्रकरणी आता बाॅलीवूड अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) यांच्या मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani) यांना मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) समन्स बजावण्यात आला आहे. ददलानी यांना शनिवारी चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. परंतु, पूजा ददलानीनं प्रकृतीचे कारण देत मुंबई पोलिसांकडे वेळ मागून घेतला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

मुंबईतील लोअर परेलमधील फिनिक्स मॉल परिसरात एनसीबीचं (NCB) एक पथक दाखल झालं आहे.
या ठिकाणीच पूजा दादलानी (Pooja Dadlani) आणि किरण गोसावी (Kiran Gosavi) यांच्यात पैशांच्या देवाण-घेवाणीबाबत चर्चा झाल्याचा संशय आहे.
यापुर्वी शाहरूख खानची मॅनेजर पूजा दादलानींची निळी मर्सिडीज इथे मुंबई पोलिसांना सीसीटीव्हीतून (CCTV) दिसली होती.
त्या गाडीतील एका महिलेनं दुसऱ्या गाडीमधील व्यक्तींशी चर्चा केल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं होतं. याबाबत तपास मुंबई पोलिस करीत आहेत.
त्याचबरोबर एनसीबी देखील याचा तपास करत आहे.
दरम्यान, एनसीबीचं (NCB) हे पथक नंतर क्रूझ टर्मिनल वर जाऊन आणखी काही लोकांची चौकशी करणार असल्याची माहिती मिळत आहे.

ड्रग्ज प्रकरणी (Mumbai Cruise Drugs Case) शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) 6 प्रकरणांची चौकशी एनसीबीचं एसआयटी पथक (SIT squad) करणार आहे.
रविवारी प्रकृती ठिक नसल्याचे कारण देत आर्यन खान एनसीबी चौकशीला उपस्थित नव्हता.
तर, आर्यनची प्रकृती ठिक असेल तर आज आर्यन खान चौकशीसाठी उपस्थित राहू शकतो.
एनसीबीचे (NCB) वरिष्ठ अधिकारी संजय कुमार सिंह (Sanjay Kumar Singh) यांच्या नेतृत्त्वात एसआयटीचं पथक शनिवारी मुंबईत दाखल झालं होतं.
त्यानंतर एक दिवसांनी एसआयटीकडे मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणासह 6 प्रकरणांचा तपास सोपवण्यात आलाय.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दरम्यान, या 6 प्रकरणांचा तपास करण्यासाठी एसआयटीचं पथक (SIT squad) दिल्लीहून मुंबईला दाखल झालं आहे.
या पथकात 13 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकात एक AD, दोन SP, 10 IO आणि JIO आहेत.
दुसरीकडे एनसीबी अधिकाऱ्यांवर करण्यात येणाऱ्या आरोपांची चौकशी करण्यासाठीही एक पथक मुंबईत दाखल झालं आहे.

Web Title : Mumbai Cruise Drugs Case | mumbai police summons to pooja dadlani mumbai police summons shah rukh khan s manager pooja dadlani

हे देखील वाचा :

Viral News | पतीला ‘कुत्रा’ बनवून रेल्वे स्टेशनवर घेऊन गेली महिला, गळ्यात साखळी बांधून फिरवले; जाणून घ्या प्रकरण

Pune Corporation | पुणे महापालिकेची ‘टॉयलेट’ कथा ! ‘मलिदा’ घेऊन बिल्डरच्या फायद्यासाठी 20 लाख रुपये खर्चून उभारलेले ‘स्वछतागृह’ मध्यरात्री ‘जमीनदोस्त’

ST Workers Agitation | ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार ! एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात मनसे मैदानात उतरणार

Related Posts