IMPIMP

Mumbai-Goa Highway | अंजनारी पुलावरून गॅस टँकर कोसळला, चालकाचा जागीच मृत्यू

by nagesh
Mumbai-Goa Highway | mumbai goa highway tanker overturns on anjanari bridge driver killed on the spot gas leak in river

रत्नागिरी : सरकारसत्ता ऑनलाइन मुंबई -गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) लांजा येथील अंजनारी पुलाजवळ (Anjanari Bridge) एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. या पुलावरून एलपीजी गॅसचा (LPG GAS) टँकर नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात टँकरची गळती सुरु झाली आहे.

काय घडले नेमके ?
मुंबईहून (Mumbai) गोव्याच्या दिशेने जाणारा 28 हजार kv टनाचा जम्बो टँकर लांजा येथील अंजनारी पुलावरून पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात टँकर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलिसांनी (Lanja Police) घटनास्थळी धाव घेतली आहे. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या अपघातातील टँकरमधून गॅसची गळती (Gas Leak) सुरु असल्याने आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हायवे क्रेनच्या साह्याने चालकाचा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे.

Web Title :- Mumbai-Goa Highway | mumbai goa highway tanker overturns on anjanari bridge driver killed on the spot gas leak in river

हे देखील वाचा :

Buldhana Poisoning Case | भगर पीठ खाल्याने 20 जणांना विषबाधा, बुलढाणा मधील घटना

Satara ACB Trap | 2 हजार रुपये लाच घेताना तहसील कार्यालयातील कारकुन आणि खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

PCMC Addl Commissioner | राजकीय दबावामुळे स्मिता झगडे यांचा बळी; नियुक्ती रद्द, अतिरिक्त आयुक्तपदावर प्रदीप जांभळे यांची वर्णी

Related Posts