IMPIMP

Mumbai High Court | ‘मैत्रीपूर्ण संबंध म्हणजे शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी समजू नये’; उच्च न्यायालयाचा मोठा निर्वाळा

by nagesh
Mumbai High Court | Bombay Mumbai high court order to admit student with learning disability in veterinary science and animal husbandry degree course mumbai

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Mumbai High Court | मुंबई हाय कोर्टाने (Mumbai High Court) एक मोठा निर्वाळा केला आहे. एखाद्या मुलीने मुलाशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले म्हणजे ती त्या मुलाला शारीरिक संबंध (Physical Contact) ठेवण्याची परवानगी देईलच, असा त्याचा अर्थ होत नाही. किंबहुना त्या मुलाने तसं गृहितही धरु नये, असे निरीक्षण नोंदवत हाय कोर्टाने एका आरोपीला दिलासा देण्यास नकार दिला आहे. (Bombay High Court)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार (Crime Against Woman) करणाऱ्या आशिष चकोर (Ashish Chakor) या आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज (Pre-Arrest Bail Application) न्यायमूर्ती भारती डांगरे (Justice Bharati Dangre) यांनी फेटाळून लावला आहे. आजच्या समाजात जेव्हा स्त्री-पुरुष एकत्र काम करत असतात, तेव्हा त्यांच्यात जवळीक निर्माण होणं स्वाभाविक असते. ते एकतर मानसिकदृष्ट्या एकत्र जोडले जातात अथवा एकमेकांवर मित्र म्हणून विश्वास ठेवतात. मैत्री ही कधीही लिंगावर आधारित नसते, असं न्यायालयानं (Mumbai High Court) स्पष्ट केलं आहे.

प्रकरण असं आहे की, तक्रारदार पीडित तरुणी आणि आरोपी या दोघांत मैत्रीपूर्ण संबंध होते.
2019 मध्ये एका दिवशी आशिषने पीडितेला आपल्या मित्राच्या घरी नेऊन तिथे तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
तरुणीने यास नकार दिल्यावर त्याने तिला लग्नाचं वचन दिलं आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
यातून ती गरोदर राहिल्यानंतर आशिष तिला टाळू लागला.
त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितेने पोलिस ठाण्यात (Police Station) धाव घेतली.
त्यानंतर आशिषविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला.

दरम्यान, याप्रकरणी अटक होऊ नये यासाठी आशिषने हाय कोर्टात धाव घेतली.
यावर न्यायमूर्ती डांगरे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली.
हाय कोर्टाच्या म्हणण्यानुसार, चांगली मैत्री म्हणजे एखाद्या पुरुषाला तिच्यावर जबरदस्ती करण्याचा परवाना देईल असा त्याचा मुळीच अर्थ होत नाही.
शिवाय शारीरिक संबंधांना तक्रारदार तरुणीने संमती देण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला होता की नाही हे तपासण्यासाठी आरोपीच्या चौकशीची आवश्यकता असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.
दरम्यान, आरोपी आशिषचा अटकपूर्व जामीन अर्ज हाय कोर्टाकडून फेटाळण्यात आला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Mumbai High Court | mumbai bombay high court refused to grant bail in rape case remarking important observations that a friendly relationship with a girl means not consent to a physical relationship

हे देखील वाचा :

Pune Crime | मांजरीत मुलासोबत लिव्ह इनमध्ये राहणार्‍या तरुणीच्या नातेवाईकाने मुलाच्या आईवडिलांना केली बेदम मारहाण

Pune Crime | ‘गँग कोणाची आहे, हे बघून तरी नादाला लागायचे’ असे म्हणत गुंडाच्या टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने वार; विश्रांतवाडी परिसरातील घटना

No Toll Plaza on Highway | विना टोल प्लाझा हाय-वेवर चालवू शकता गाडी, सरकार आणत आहे ही नवीन System

Related Posts