IMPIMP

Mumbai High Court | शारीरीक संबंधानंतर विवाहाला नकार देणे फसवणूक नाही; मुंबई उच्च न्यायालयाने तरूणाची केली सुटका

by nagesh
Bombay High Court | mumbai bombay high court bjp girish mahajan maharashtra assembly speaker election governor bhagat singh koshyari

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Mumbai High Court | मोठ्या कालावधीपर्यंत शारीरीक संबंध (Physical Relation) ठेवल्यानंतर जर कुणी विवाहाला नकार (refuse to marry) दिला तर त्यास फसवणूक (Cheating) मानता येणार नाही. खालच्या न्यायालयाकडून एका तरूणाला दोषी ठरवण्याचा निर्णय बदलत मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) ही टिप्पणी केली. पालघरमध्ये राहणारा काशीनाथ घरत याच्याविरूद्ध गर्लफ्रेंडच्या तक्रारीवरून पोलिसांनी IPC 376 आणि 417 च्या अंतर्गत बलात्कार (Rape Case) आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

गर्लफ्रेंडचा आरोप होता की, काशीनाथने विवाहाचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले आणि आश्वासन पाळले नाही. या बाबत 19 फेब्रुवारी 1999 ला अतिरिक्त सेशन जज यांनी काशीनाथला बलात्काराच्या आरोपातून मुक्त केले होते पण फसवणुकीसाठी दोषी ठरवले होते.

न्यायालयाने काशीनाथला विवाहाचे आश्वासन देऊन तीन वर्षापर्यंत शारीरीक संबंध ठेवणे आणि नंतर आश्वासन न पाळल्याच्या आरोपाखाली 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. काशीनाथ घरतने या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आव्हान दिले होते, जिथे जस्टिस अनुजा प्रभुदेसाई यांच्या सिंगल बेंचने त्यास फसवणुकीच्या आरोपातून सुद्धा मुक्त केले.

जस्टिस प्रभुदेसाई (justice anuja prabhudessai) यांनी म्हटले की, तथ्य हे सांगतात की, महिला आणि आरोपीमध्ये तीन वर्ष फिजिकल रिलेशनशिप सुरू होती आणि दोघांचे अफेयर होते. जस्टिस म्हणाले, महिलेच्या जबाबातून हे सिद्ध होत नाही की तिला कोणत्याही प्रकारे अंधारात ठेवले होते.

केसच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने (Bombay High Court) अशा प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सुद्धा उल्लेख केला.
कोर्टाने म्हटले की, हे सिद्ध झाले पाहिजे की, महिलेच्या समोर आश्वासन देत चुकीची तथ्य ठेवली होती आणि नंतर त्या गोष्टी चुकीच्या ठरली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

न्यायालयाने म्हटले की, दोन गोष्टी सिद्ध झाल्या पाहिजेत, पहिली ही की चुकीची माहिती देऊन विवाहाची बोलणी झाली होती.
दुसरी ही की, आश्वासनच चुकीचे होते आणि त्यास बळी पडून महिला लैंगिक संबंधासाठी तयार झाली होती.

हायकोर्टाने म्हटले की, या प्रकरणात या गोष्टीचा कोणताही पुरवा सापडत नाही की, आरोपीला महिलेसोबत विवाह करायचा नव्हता.
येथे ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी पुरेशी तथ्य नाही की महिलेला चुकीची माहिती देऊन आरोपीने लैगिक संबंधासाठी तयार केले होते.
अशावेळी त्यास दिर्घ रिलेशनशिप नंतर विवाहाला नकार देण्यासाठी फसवणुकीसाठी दोषी मानले जाऊ शकत नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

Web Title :- Mumbai High Court | refusal to marry after long physical relationship is not cheating says bombay high court

हे देखील वाचा :

Maharashtra GST Department | 233 कोटींची खोटी बिले देणाऱ्या व्यापाऱ्यास अटक; GST विभागाची पुण्यात मोठी कारवाई

BMC ची नवी नियमावली जारी ! लग्न, नववर्षाच्या पार्ट्यांत ठेवा 6 फुटांचे अंतर; 200 व्यक्तींच्या कार्यक्रमासाठीही नियम

Priyanaka Chopra | …म्हणून प्रियंकाने हटवलं तिच्या नावा समोरील अडनाव

Related Posts