IMPIMP

मुंबईत Lockdown होणार की नाही? पालकमंत्र्यांनी दिले ‘हे’ संकेत

by bali123
mumbai lockdown news live guardian

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – सध्या राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कदाचित लॉकडाऊन lockdown करण्याची गरज भासू शकते अशी चर्चा सर्वत्र चालू आहे. कडक लॉकडाऊन lockdown करायला लावू नका असे मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगूनसुद्धा अनेक लोकांकडून कोरोना नियमांचं उल्लंघन केले जात आहे. पण सध्या तरी गेल्या वर्षीसारखा कडक लॉकडाऊन लावला जाणार नाही असे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले आहे. मुंबईत लॉकडाऊन सारखे नियम प्रथम जिथ रुग्ण आढळतात ती सोसायटी कंटेन्मेंट झोन करून मग गरज पडली तर नियम कडक करू असे शेख यांनी स्पष्ट केले आहे. तसेच शहरात टप्प्या टप्प्याने कडक नियम करण्यात येतील असेसुद्धा अस्लम शेख म्हणाले.

पंकजा मुंडे यांना धक्का ! माजी आमदाराची राष्ट्रवादीच्या बैठकीला हजेरी, काही मिनिटांचं भाषणही दिलं

“राज्यात कोरोना वाढतो तसाच मुंबईत वाढतो पण आम्ही सगळे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मुंबई शहरात परत काही ठिकाणी रुग्ण वाढत असल्याचे लक्षात घेत जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू करतो आहोत. यासंदर्भात महापालिका हाॅस्पिटलची तयारी पूर्ण झाली आहे. रुग्णालयात बेड शिल्लक आहेत, पण खासगी रुग्णालयात गर्दी जास्त केली जात आहे”, असे देखील अस्लम शेख म्हणाले.

अत्यंत महत्त्वाची बातमी : महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का? राजेश टोपे यांनी सुचवला ‘हा’ नवीन पर्याय

सार्वजनिक वाहतुकीमुळे रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यावर बोलताना अस्लम शेख म्हणाले, लोकल किंवा बेस्ट, एसटी बसमध्ये गर्दी आहे हे खरे आहे पण सध्या जे कोरोना रुग्ण सापडत आहेत ते मोठ्या सोसायटीमधील आहेत. यामध्ये लोकल प्रवास करणारे किती लोक आहेत याचा विचार केला पाहिजे. उच्चभ्रू सोसायटी आणि प्रभाग अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहेत. या तुलनेत झोपडपट्टी आणि मध्यमवर्गीय भागांमध्ये रुग्णसंख्या तितकीशी वाढलेली नाही आहे. यामुळे लोकल, बेस्ट, एसटी सेवा तात्काळ बंद करणे हि मागणी योग्य नाही, असेदेखील ते म्हणाले. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये रात्री उशिरापर्यंत पब, डिस्को,  हाॅटेलांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने आणि पोलिसांनी यासंदर्भात कारवाई करावी असे आदेश देण्यात आले आहेत. आता यापुढे कडक निर्बंध लावण्यात येतील असे संकेत देखील पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत.

हेही वाचा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या भावात किचिंत वाढ, जाणून घ्या आजचा दर

PF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी ! EPFO ने WhatsApp वर सुरू केलीय ‘ही’ खास सेवा, जाणून घ्या

Singh is King : युवराजने एकाच षटकात ठोकले 6,6,6,6; पहा व्हिडीओ

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! पगारात होणार मोठ्या प्रमाणात वाढ

Photos : Nude फोटोशुटनंतर मराठी अभिनेत्री वनिता खरात पुन्हा एकदा चर्चेत ! Bold फोटो शेअर करत दिला ‘खास’ मेसेज

‘मनसुख हिरेन यांच्याप्रमाणे सचिन वाझेंची हत्या होऊ शकते’, भाजप आमदाराने केली ‘ही’ मागणी

DIY Hand Mask : केवळ 3 गोष्टीने दूर होईल हाताचा कोरडेपणा जाणून घ्या

Jalgaon : ’10 दिवसात सगळं जुळून आलं’ असं म्हणत एकनाथ खडसेंनी सांगितला जळगाव महापालिकेतील विजयाचा ‘फॉर्म्युला’

Photos : ‘तारक मेहता…’ मधील ‘रिपोर्टर’ रिटानं शेअर केले ‘बोल्ड’ बिकिनीतील फोटो ! ‘बॉडी शेमिंग’बद्दल म्हणाली – ‘माझ्या शरीरावर खूप सारे…’

सचिन वाझेनंतर NIA करणार आणखी एका Police अधिकार्‍याला अटक? मुंबई पोलीस दलात प्रचंड खळबळ

Related Posts