IMPIMP

मुंबई : 11 दिवसातच झाला महिनाभरा इतका पाऊस, IMD ने रविवारपर्यंत जारी केला हाय अलर्ट

by omkar
Mumbai Monsoon

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुंबईत मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Mumbai Monsoon) सुरू आहे. मान्सूनच्या सुरुवातीच्या अवघ्या 11 दिवसातच पावसाचा आकडा 505 मिलीमीटरच्या मासिक सरासरीच्या पुढे गेला आहे. मुंबईत 565.2 मिमी पाऊस नोंदला गेला आहे. शुक्रवारी रात्रीपासून मंगळवारपर्यंत मुंबईत जोरदार पाऊस (Mumbai Monsoon) होऊ शकतो. या दरम्यान 200 मिमी पाऊस (Monsoon) होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीमध्ये रविवारसाठी हाय अलर्ट घोषित केला आहे.

सलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ ! 23 वेळा वाढले पेट्रोल डिझेलचे भाव, जाणून घ्या नवे दर

रविवारी राज्याच्या काही भागात 24 तासात 204.5 मिमी पर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे. मंगळवारपर्यंत कोकण परिसरात ऑरेंज अलर्ट जारी राहील. सांताक्रूज येथील वेधशाळेनुसार, शुक्रवारी रात्री 8:30 वाजेपर्यंत 24 तासात मुंबईत 107 मिमी पाऊस झाला आहे. हवामान विभागाच्या अधिकार्‍यांनी म्हटले की, बंगालच्या खाडीवर तयार होत असलेल्या कमी दाबाचा पट्टा 11 जून शुक्रवारपर्यंत पूर्ण तयार झाला आहे. याच्यामुळे दक्षिण-पश्चिमच्या मान्सूनमुळे जोरदार पाऊस येईल, जो शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत महाराष्ट्राच्या जवळपास सर्व किनारी भागाला व्यापून टाकेल.

12 जून राशीफळ : ‘या’ 6 राशींना होणार फायदा, नोकरी-व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात मिळेल यश, इतरांसाठी असा आहे शनिवार

कुलाबा वेधशाळेने शुक्रवारी रात्री 8:30 वाजता 24 तासात केवळ 23.4 मिमी पाऊस नोंदला. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार जोरदार पावसानंतर सुद्धा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्‍या 7 तलावांमध्ये पाण्याची कमतरता आहे.

Monsoon | Weather Alert ! पुण्यात पुढील 4 दिवस मुसळधार; रायगड, मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाला सुरुवात होणार

बीएमसीने सुरू केली कार्यवाही
हवामान विभागाकडून मिळालेल्या इशार्‍यानंतर बृहन्मुंबई महापालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Husband Killed Wife | नवरा – बायको एकत्र बसून पित होते दारू; पतीने पत्नीचा गळा धारदार शस्त्राने कापला

Related Posts