IMPIMP

मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारचा मालक मृतावस्थेत आढळला, आत्महत्या की घातपात ? घनटेमुळं प्रचंड खळबळ

by sikandershaikh
mukesh-ambani-house-antilia-suspicious-scorpio-car

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओचा मालक कळवा खाडीत मृतावस्थेत सापडला आहे. हिरेन मनसुख असं त्यांचं नाव आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे. हिरेन मनसुख यांनी खाडीत उडी मारून आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी प्राथमिक तपासात वर्तवला आहे.

ठाण्यातील नौपाडा येथे ते वास्तव्यास होते. आज सकाळी 10.25 मिनिटांनी मनसुख यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. आज दुपारी मनसुख बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी नौपाडा पोलीस ठाण्यात दिली होती.

जी स्कॉर्पिओ अंबानी (Mukesh Ambani) यांच्या निवासस्थानाबाहेर सापडली होती तिचा चेसिस क्रमांक आणि इंजिन क्रमांक घासून काढण्यात आला होता. मात्र वाहन जुने असल्यानं काचेवर असलेल्या क्रमांकावरून तिची ओळख पटली होती.

तपासात असं समोर आलं होतं की, ही कार मुलुंड उड्डाणपुलाखालून चोरी केली होती.
याबाबत विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यानंतर ठाणे परिसरात राहणाऱ्या हिरेन मनसुख यांची ही स्कॉर्पिओ असल्याचं तपासात आढळून आलं होतं.

Related Posts