IMPIMP

Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, बोरघाटात कंटेनरने 6 गाड्यांना उडवलं

by nagesh
Mumbai Pune Expressway | today mumbai pune express way brake failed container hits five to six cars maharashtra accident news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai Pune Expressway) सुरु असलेली अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. शुक्रवारी (दि.25) सकाळी साडेनऊच्या सुमारास एका भरधाव कंटेनरने बोर घाटात सहा वाहनांना उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातात (Mumbai Pune Expressway) वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai Pune Expressway) बोर घाटात किमी 38 जवळ आज सकाळी 9.30 च्या सुमारास सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला. मुंबई लेनवर भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने सोमोर जाणाऱ्या प्रवासी वाहनांना धडक दिली. अपघातानंतर पळून गेलेल्या कंटेनर चालकाला महामार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले.

या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नसले तरी काही कार चालक किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काहीवेळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक पुर्ववत केली.

अपघातग्रस्त वाहने
1. एर्टीगा – MH 14 JM 5455
2. एर्टीगा – MH 01 BF 8531
3. एर्टीगा – GJ 15 CK 0365
4. इनोव्हा – MH 14 JA 1385
5. इनोव्हा – MH 12 GK 8833
6. पोलो – MH -12 TS 5407

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Mumbai Pune Expressway | today mumbai pune express way brake failed container hits five to six cars maharashtra accident news

हे देखील वाचा :

Sanjay Raut On Maharashtra Karnataka Border Issue | ‘शिवाजी महाराजांच्या मुद्यावरुन लक्ष हटविण्यासाठी भाजपने बोम्मई यांना पुढे करुन सीमावादाचा प्रश्न काढला’

Amit Shah On Shraddha Walker Murder Case | महाराष्ट्रातील ‘त्या’ पोलिसांची चौकशी होणार – गृहमंत्री अमित शहा

Amruta Fadnavis On Bhagat Singh Koshyari | ‘राज्यपालांचे महाराष्ट्रावर प्रेम, पण… , त्यांच्या विधानाचा नेहमी चुकीचा अर्थ घेतला जातो’ – अमृता फडणवीस

Related Posts