IMPIMP

Mumbai Pune Vande Bharat Train | प्रवाशांसाठी खुशखबर ! मुंबई-पुणे प्रवास अवघ्या अडीच तासात पूर्ण होणार

by nagesh
Mumbai Pune Vande Bharat Train | vande bharat train the mumbai pune journey will be completed in just two and a half hours

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Mumbai Pune Vande Bharat Train | मुंबई – पुणे प्रवास (Mumbai-Pune journey) आता फक्त अडीच तासात पुर्ण होणार आहे. महाराष्ट्राला लवकरच ‘वंदे भारत ही ट्रेन मिळणार आहे. त्यामुळे हा प्रवास अधिक सुृखकर होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 15 ऑगस्टपर्यंत या ट्रेनच्या फेऱ्या सुरु होणार असून मुंबई – पुणे प्रवास करणाऱ्यासाठी हि एक दिलासादायक बातमी आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मुंबई – पुणे प्रवास करण्यासाठी सर्वात कमी वेळेत धावणारी डेक्कन एक्सप्रेस (Deccan Express) ही पहिली ट्रेन होती. ही ट्रेन साधारण 3 ते 4 तासात पोहचायची. दरम्यान आता मात्र महाराष्ट्राला पहिली ‘वंदे भारत ट्रेन’ (Mumbai Pune Vande Bharat Train) मिळणार आहे. या ट्रेन मार्फत मुंबई – पुणे प्रवास आता केवळ अडीच तासात पुर्ण होणार आहे. ही ट्रेन एसी आणि सीटींग असणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे अर्धा तास वाचणार आहेत.

दरम्यान, वंदे भारत ट्रेनमध्ये GPS – आधारित प्रवासी माहिती, सीसीटीव्ही कॅमेरे, स्वयंचलित दरवाजे आणि व्हॅक्यूम आधारित बायो टॉयलेट यांसारख्या सुविधा आहेत.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना सहज बाहेर काढण्यासाठी वंदे भारत ट्रेनमध्ये 4 आपत्कालीन खिडक्या बसवल्या आहेत.
ट्रेनमध्ये जेवणाचीही सोय केली आहे. तिकीटाच्या दरातच त्याच्या किमती समाविष्ट केल्या जातात.

वंदे भारत या ट्रेनची निर्मीतीच वेगवान प्रवास होण्यासाठी करण्यात आलीय.
प्रवाशांचा प्रवासाचा वेळ वाचणार असल्याने ही ट्रेन अनेकांना उपयुक्त ठरणार आहे.
काही मुख्य शहर जोडण्यासाठी वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात आली होती.
आगामी 2 वर्षात 400 वंदे भारत ट्रेन चालवण्यात येणार आहे. त्याचबरोबर वाराणसी – नवी दिल्ली (Varanasi- New Delhi),
वैष्णोदेवी – नवी दिल्ली (Vaishno Devi-New Delhi) या ट्रेन सध्या सुरु केल्या आहेत.
15 ऑगस्टपर्यंत 2 नवीन गाड्या सुरु होऊ शकतात, अशी माहिती आहे. त्यात मुंबई – पुणे ही ट्रेनही सुरु होण्याची शक्यता आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Mumbai Pune Vande Bharat Train | vande bharat train the mumbai pune journey will be completed in just two and a half hours

हे देखील वाचा :

Jayant Patil On Raj Thackeray | राज ठाकरेंच्या पत्रावरून जयंत पाटलांचा टोला; म्हणाले – ‘राज्यातील घराघरापर्यंत पोहोचेल इतका मनसे पक्ष मोठा नाही’

DL Renewal | Driving Licence एक्सपायर झाले असेल तर करू नका चिंता, ‘या’ स्टेप्स फॉलो करून घरबसल्या करा आपले DL रिन्यू

Fact Check | केंद्र सरकारने New Pension Scheme (NPS) कडे फिरवली पाठ, जुनी पेन्शन स्कीम कायम ! जाणून घ्या काय आहे सत्य

Related Posts