IMPIMP

Mumbai Satara Lane | मुंबई-सातारा लेन आज रात्री दोन तास बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

by nagesh
Mumbai Satara Lane | tunnel blast on mumbai satara lane traffic closed for two hours tonight

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Mumbai Satara Lane | चांदणी चौकाजवळील पूल (Chandni Chowk Bridge) पाडल्यानंतर या मार्गाचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. मुंबईकडून साताऱ्याकडे  जाणाऱ्या लेनवर सर्व्हिस रस्त्याच्या रुंदीकरणासाठी (Widening of Service Road) आज (मंगळवार) मध्यरात्री 12.15 च्या सुमारास अडथळा ठरणाऱ्या दगडांवर सुरुंग लावून स्फोट (Tunnel Blast) करण्यात येणार आहे. याकामासाठी रात्री 11.30 ते 1.30 या कालावधीत मुंबई-सातारा लेनवरील वाहतूक बंद (Traffic Closed) ठेवली जाणार असल्याचे पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे (PCMC Traffic DCP Anand Bhoite) यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सातारा-मुंबई लेन 20 मिनिटे बंद राहणार

चांदणी चौकातील पुल पाडल्यानंतर सर्व्हिस रस्त्यावरील अडथळे दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी अडथळा ठरणाऱ्या दगडांना सुरुंग लावून स्फोट करण्यात येणार आहे. सुरुंग स्फोट मुंबई-सातारा लेनवर (Mumbai-Satara Highway) करण्यात येत असल्याने स्फोट होण्यापूर्वी सातारा-मुंबईकडे जाणारी लेन (Mumbai Satara Lane) पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. ही लेन साधारणपणे 20 मिनिटे बंद ठेवली जाणार आहे.

या पर्यायी मार्गाचा वापर करा

मुंबई ते सातारा लेन बंद असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्ग वाकड (Wakad) ते शिवाजीनगर
(Shivajinagar) ते कात्रज (Katraj) याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तर सातारा ते मुंबई लेन स्फोटानंतर सुरु राहील. स्फोटानंतर सर्व्हिस रोडच्या दोन लेन तयार करण्याच मार्ग मोकळा केला जाईल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Mumbai Satara Lane | tunnel blast on mumbai satara lane traffic closed for two hours tonight

हे देखील वाचा :

Pune Accident News | पुण्यातील MIT कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा भीषण अपघातात मृत्यू, नारायणगाव येथील घटना

Latur ACB Trap | प्रधानमंत्री पीक विम्याच्या कामासाठी लाच घेणारे एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीचे दोन प्रतिनिधी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Latur Accident News | तुळजापूर येथून दर्शन घेऊन परतणार्‍या भाविकांवर काळाचा घाला; कार-एस टी बसच्या धडकेत पाच जण जागीच ठार

Related Posts