IMPIMP

Mumbai University | मुंबईतील महाविद्यालये 20 ऑक्टोबरपासून सुरु होणार

by nagesh
Mumbai University | college affiliated mumbai university will be started from october 20 university announced sop

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  Mumbai University | कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गेल्या दिड वर्षापासून शाळा, महाविद्यालये (universities) बंद होती. दरम्यान, सध्या कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्याने राज्य सरकारने (Maharashtra Government) कोरोनाचे नियम पाळून शाळा, काॅलेजेस सुरु करण्यास परवानगी दिली आहे. येत्या 20 ऑक्टोबरपासून मुंबईतील विद्यापीठे (Mumbai University) आणि वरिष्ठ महाविद्यालये (colleges) सुरू होणार आहेत. यावरुन मुंबई विद्यापीठाकडून आपल्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालये सुरु करण्यासाठी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या पार्श्वभुमीवर विद्यापीठानं एसओपी जारी केले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने राज्यातील (State Government) शाळा, महाविद्यालये कोरोनाचे नियम पाळून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, महाविद्यालय सुरु होणार पंरतु, वसतिगृह सुरु करण्याच्या बाबतीत अद्याप संभ्रम कायम आहे.
50 टक्के आसन क्षमतेने स्थानिक प्राधिकारच्या आणि विद्यापिठाच्या सहमतीने वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.
तर, 18 वर्षांवरील विद्यार्थी ज्यांचे 2 डोस घेतलेले आहेत त्यांनाच परवानगी देण्यात येईल.
महाविद्यालय सुरू करताना कोरोना प्रादुर्भाव रूग्णसंख्या याचा आढावा स्थानिक प्रशासन,
महापालिका (BMC) आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्याशी (Mumbai University) संयुक्त विचार विनिमय करून घेता येईल.

दरम्यान, महाविद्यालय सॅनिटाइझ करणे, स्वच्छता राखणे, सुरक्षित अंतर, मास्क या नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे.
वसतिगृह सुरू करण्याबाबत निर्णय टप्प्याटप्प्याने आढावा बैठक घेऊन घेतला जाईल. असं राज्य सरकारनं सांगितलं.
लसीकरण (Vaccination) पूर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी कर्मचाऱ्यांसाठी विशेष लसीकरण राबवण्यात येणार आहे.
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात येणे शक्य नसणार आहे. त्या विद्यार्थ्यांना ॲानलाईनचा मार्ग खुला असणार आहे.

Web Title : Mumbai University | college affiliated mumbai university will be started from october 20 university announced sop

हे देखील वाचा :

Multibagger Stock | गुंतवणुकदारांमध्ये सुपरहिट आहे ‘ही’ म्युझिक कंपनी, एक वर्षात 700 टक्केपेक्षा जास्त दिला ‘रिटर्न’; जाणून घ्या

Gold Silver Price Today | आजही सोन्या-चांदीच्या किंमती कमीच; जाणून घ्या आजचे दर

Pune News | भारतीय समतावादी पक्षाचे रक्तदान शिबीर संपन्न

BJP Vs Shivsena | भाजपचे शिवसेनेला प्रत्युत्तर; ‘… त्यांच्याच कौतुकाच तुणतुणं वाजवत फिरायची शिवसेनेवर वेळ आली’

Related Posts