IMPIMP

Murbad police | बोलेरो पीक गाड्या चोरणारा चोरटा मुरबाड पोलिसांच्या जाळ्यात

by nagesh
Murbad police | Bolero Peak car thief caught by Murbad police

मुरबाड : सरकारसत्ता ऑनलाइन मुरबाड मधून दोन बोलेरो पिकअप (Bolero Pik-Up) गाड्यांची चोरी करणाऱ्या चोराला मुरबाड पोलिसांनी (Murbad police) बेड्या ठोकल्या (Arrest) आहेत. तर त्याचे इतर दोन साथिदारांचा मुरबाड पोलीस (Murbad police) कसून शोध घेत आहेत. चेतन पुंडलिक पष्टे Chetan Pundalik Pashte (वय – 29 रा. माजगाव, ता. मुरबाड) असे शिताफीने अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मुरबाड तालुक्यातील साजई येथील सौरभ मनीष कोंदे यांच्या मालकिचे दोन महेंद्र बोलेरो कंपनीचे पीकप क्रमांक MH 05 DK 2458 आणि MH O5 DK 2459 हे दिनांक 19 सप्टेंबर 2021 रोजी मुरबाड येथील अंजनी गॅस एजन्सीच्या (Anjani Gas Agency) मागील बाजूला उभे केले होते. चोरट्यांनी हे दोन्ही पिकअप चोरुन नेले होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Murbad पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करुन एकाला अटक करण्यात आली आहे. चोरट्यांनी दुसऱ्या चावीने 10 लाखाचे दोन पिकअप चोरुन नेले होते. या गुन्ह्याची यशस्वी उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. तपासात पोलिसांना एक बाब समोर आली आहे, ती म्हणजे टेम्पो मालक यांनी ज्याचे कडून यांनी दोन्ही टेम्पो खरेदी केले होते त्याने तक्रारदारास एकच चावी दिली होती. दोन्ही टेम्पो Electric बनावटीचे होते. डुप्लिकेट चावीने चालू होणाऱ्या नव्हत्या हाच धागा पकडून ,कौशल्यपुर्वक तपास करून मुरबाड पोलीस ठाण्याच्या (Murbad Police Station) गुन्हे प्रकटिकरण पथकातील पोलिसांनी आरोपी अटक केली व दोन्ही टेम्पो जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. नजीकचे काळात घडलेली हि मोठी चोरी उघडकीस आणण्यात मुरबाड पोलिसांना यश आल्याने त्यांचें मुरबाडमध्ये कौतुक होत आहे.

या पिकअप बोलेरो गाड्यांच्या चोरी बाबत कोणताही ठोस सुगावा नसतांना आपली तपासाची चक्रे वेगात फिरवली तपास जारी ठेवला होता.
चोरांचा शोध युद्ध पातळीवर सुरू असतानाच गुप्त माहितीच्या आधारे ह्या दोन्ही पीकप गाड्या बदलापूर (Badlapur), हेंदरेपाडा (Hendrepada) येथे मिळून आल्या.
आरोपीच्या अन्य दोन साथीदारांचा मुरबाड पोलीस कसोशीने शोध घेत आहेत.
कोणताही मागमूस नसतांना आपल्या कर्तव्यदक्ष कामगिरीने आरोपीच्या मुसक्या आवळण्यात मुरबाड पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे (Police Inspector Prasad Pandhare)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भगवान नारायण निचिते, पोलीस नाईक शिंदे, पोलीस नाईक मोरे हे करीत आहेत.

Web Title :- Murbad police | Bolero Peak car thief caught by Murbad police

हे देखील वाचा :

Small Saving Scheme | पैशांची असेल गरज तर ‘या’ 2 बचत योजनांवर मिळते चांगले कर्ज; जाणून घ्या व्याजदर

7th Pay Commission | 31 % DA झाल्यानंतर 56000 रुपये बेसिक पगार घेणार्‍यांना वर्षात मिळतील 2 लाख रुपये, जाणून घ्या गणित

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 122 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts