IMPIMP

Nana Patole | मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीसांवरील आरोपांची चौकशी करावी – काँग्रेस

by nagesh
Nana Patole | get congress leader nana patoles tongue cut 1 lakh reward bjp leaders open threat at jalana

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Nana Patole | राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार आरोप केले आहे. मागील दोन दिवसांपासून मलिक आणि फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. या पार्श्वभुमीवर काॅग्रेसने (Congress) देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भुमिका स्पष्ट केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

माध्यमांशी बोलताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, ‘इंधन दरवाढ, वाढती महागाई, बेरोजगारी, शेतक-यांचे प्रश्न हे महत्त्वाचे मुद्दे आहेत.
आम्ही हे मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये जाऊन जनजागृती करून केंद्रातील मोदी सरकारविरोधात (Modi government) आंदोलन करणार आहोत.
तसेच, राज्यातील राजकीय परिस्थिती अतिशय भयानक बनलीय. नेतेमंडळी एकमेकांवर गंभीर आरोप करत आहेत, ही राज्यासाठी लाजीरवाणी बाब आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नवाब मलिक यांनी एकमेकांविरुद्ध केलेले आरोप गंभीर आहेत.
त्यामुळे, या दोन्ही नेत्यांवरील आरोपांची चौकशी करायला पाहिजे, अशी मागणीच पटोले यांनी केलीय.

पुढे नाना पटोले म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचा (ST workers) संप सामोपचाराने मिटला पाहिजे.
सणासुदीचे दिवस आहेत सर्वसामान्य जनतेला संपाचा त्रास होऊ नये ही सुरुवातीपासून काँग्रेस पक्षाची भूमिका राहिली आहे.
सरकारने एसटी कर्मचा-यांच्या महागाई भत्ता, पगार यात वाढ करून त्यांच्या मागण्याही मान्य केल्या आहेत.
पण, भाजप नेते एसटी कामगारांची दिशाभूल करत आहेत.
आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी भाजप (BJP) एसटी कामगारांचा वापर करत असल्याचं नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Nana Patole | chief minister should investigate allegations against ncp leader nawab malik and bjp leader devendra fadanvis leaders

हे देखील वाचा :

Pune Traffic | पुण्यातील कामगार पुतळा, राजीव गांधी वसाहत पुनर्वसन कारवाई गुरूवारी; शिवाजीनगर कोर्टाजवळील परिसरातील वाहतूक मार्गात बदल

Mayor Muralidhar Mohol | महापौरांचा रक्तदानाचा संकल्प पुणेकरांकडून सिद्धीस ! मुरलीधर मोहोळांवर रक्तदानरुपी शुभेच्छांचा वर्षाव, 3860 जणांकडून रक्तदान; लेकीसह महापौरांकडून ‘महादान’ !

Param Bir Singh | परमबीर सिंग यांना मुंबईतील कोर्टाचा मोठा धक्का ! न्यायालयाने दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

Related Posts