IMPIMP

Nana Patole | ‘गावगुंड मोदीला पकडण्यात आलंय, त्यानच मला पाडण्याचा प्रयत्न केला होता’ – नाना पटोले

by nagesh
Nana Patole | reply from congress state president nana patole on shivsena leader chandrakant khaires claim that 22 congress mlas are ready for fadnavis

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Nana Patole | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ”मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो” असं वादग्रस्त विधान नाना पटोले यांनी भंडारा जिल्ह्यात (Bhandara) सभेदरम्यान केलं होतं. यानंतर वादंग निर्माण झाला. या विधानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल (Video Viral On Social Media) झाल्याने भाजप (BJP) आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. नाना पटोलेंवर देशद्रोहाचा गुन्हा (Sedition Case) दाखल करण्याची मागणी भाजपने केलीय. त्यानंतर नाना पटोलेंनी भाजपवर पुन्हा निशाणा साधत ‘ते विधान गावगुंड मोदीबद्दलच होतं,’ असा खुलासा केला, त्यानंतर पटोलेंनी आणखी एक खुलासा केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

‘ते विधान गावगुंड मोदीबद्दलच होतं,’ असं ज्यावेळी नाना पटोले (Nana Patole) यांनी खुलासा केला, त्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. नाना पटोले यांचा खुलासा खोटा असल्याचा आरोप भाजपचे उपाध्यक्ष माधव भंडारी (Madhav Bhandari) यांनी केला. त्याचबरोबर नाना पटोलेंनी त्या गावगुंडाचा फोटो आणि संपूर्ण माहिती प्रसिद्ध करावी, असा इशारा भंडारी यांनी दिला आहे. त्यानंतर पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ”भाजप एखाद्या मुद्द्याला धरुन राजकारण करत आहे. तसेच, देशातून नीरव मोदी, ललित मोदी देश लुटून पळून गेले त्याची भाजप नेते चौकशी करत नाहीत.” असं ते म्हणाले.

नाना पटोले म्हणाले, ”पोलिसांचा तपास सुरू आहे. भंडारा पोलिसांनी मोदी नावाच्या गावगुंडाला पकडलं आहे.
पोलीस चौकशी करत आहेत. काँग्रेसच्या जिल्हाप्रमुखांना भाजप नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे सूचवले आहे.
बिल्कुल त्यानं माझ्याविरोधात खूप प्रचार केला, मला पाडण्याचा प्रयत्न केला.
त्या लोकांमुळे मला हे कळालं, ज्या पद्धतीने भाजप पंतप्रधान पदाची गरिमा खालावत आहे,
त्या भाजप नेत्यांविरुद्ध, कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे सांगितलं आहे.
दरम्यान, बाकी भंडारा पोलिसांना विचारा,” असं देखील पटोले यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Nana Patole | congress leader nana patole gawagund modi has been caught bhandara police investigate says nana patole on modi statement

हे देखील वाचा :

Corporator Archana Tushar Patil | नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या विकास निधीतून प्रभाग 19 मध्ये 3 कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन

Pimpri Corona Updates | चिंता वाढली ! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 3000 पेक्षा अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता

Related Posts