IMPIMP

Nana Patole | ‘ही इंग्रजांची पद्धत, महाराष्ट्र खपवून घेणार नाही’; नाना पटोलेंची मंगलप्रभात लोढांच्या विधानावर टीका, राजीनाम्याची मागणी

by nagesh
Nana Patole | ambedkar thackeray alliance has nothing to do with maha vikas aghadi nana patole reacts

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – “अगोदर बोलायचं आणि नंतर माफी मागायची अशी इंग्रजांची पद्धत आहे. ही पद्धत महाराष्ट्र खपवून घेणार नाही.
एवढंच त्यांना वाटत असेल तर तातडीने राजीनामा द्यावा,” असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री
मंगलप्रभात लोढा यांच्या कालच्या (30 नोव्हेंबर) वक्तव्याचा निषेध केला आहे. बुधवारी (30 नोव्हेंबर) प्रतापगडावर शिवप्रतापदिनी झालेल्या कार्यक्रमात
महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाला शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची उपमा दिली होती. त्यानंतर
महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांनी मंगलप्रभात लोढांवर टीका केल्यानंतर काँग्रेसलाही जाग आली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पत्रकार परिषद घेत लोढांनी केलेल्या विधानावर टीका केली.

शिवप्रताप दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही मंत्री प्रतापगडावर गेले होते. या ठिकाणी विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. तिथे बोलताना भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या एका विधानामुळे विरोधी पक्षनेत्यांकडून जोरदार टीका होत आहे. शिवप्रतापदिनी प्रतापगडावर मंगल प्रभात लोंढा म्हणाले, “शिवराय आग्र्यातून बाहेर पडले, तसेच शिंदे बाहेर पडले. औरंगजेबाने शिवरायांना रोखलं तसंच शिंदेंनाही कुणीतरी रोखलं होतं. शिवराय स्वराज्यासाठी बाहेर पडले, तर शिंदे महाराष्ट्रासाठी.”

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, “मुद्दा असा आहे की यांची
(मंगलप्रभात लोढा) जीभ वळते कशी? फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल
असं वक्तव्य करण्यासाठी यांची जीभ कशी वळते? यांनी माफी मागावी.
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत यायचं आणि नंतर त्यांचाच अवमान करायचा,
हा भाजपला कोणी अधिकार दिला. हा प्रश्न या राज्यातील जनता आणि काँग्रेस विचारते आहे.
अगोदर बोलायचं आणि नंतर माफी मागायची अशी इंग्रजांची पद्धत आहे. ही पद्धत महाराष्ट्र खपवून घेणार नाही. एवढंच त्यांना (मंगलप्रभात लोढा) वाटत असेल तर तातडीने राजीनामा द्यावा. अशी भूमिका आमची आहे, यांना माफी नाही.” लोढांच्या राजीनाम्याची मागणी नाना पटोले यांनी केली आहे. याशिवाय, शिवाजी महाराजांच्या विचारांत गद्दारांना कधीच माफी नव्हती, महाराष्ट्रातील जनता हीच भूमिका घेऊन लढत आहे. या भावना जर भाजपने लक्षात घेतल्या नाहीत, तर त्यांना निश्चितच महाराष्ट्रातील जनता धडा शिकवल्याखेरीज राहणार नाही, असेही ते म्हणाले.

Web Title :- Nana Patole | congress state president nana patoles criticism of mangalprabhat lodhas statement about chhatrapati shivaji maharaj

हे देखील वाचा :

Sadabhau Khot | सदाभाऊ खोतांची जीभ घसरली, म्हणाले – ‘राज्यकर्ते म्हणजे रेड्याची अवलाद’

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन केदार जाधव अ‍ॅकॅडमीचा दुसरा विजय; इव्हॅनो इलेव्हन संघाने गुणांचे खाते उघडले

Virat Kohli | विराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रम; ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिला क्रिकेटर

Related Posts