IMPIMP

Nana Patole | मविआच्या जागा वाटपाबाबत नाना पटोलेंचे मोठे विधान, म्हणाले-‘मविआमध्ये जागा वाटपाविषयी…’

by nagesh
Nana Patole | Nana Patole's big statement about seat allocation in Mavia, said- 'About seat allocation in Mavia...'

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाईन – काँग्रेस प्रदेश अध्यक्ष (Congress State President) नाना पटोले (Nana Patole) हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद सधाताना नाना पटोले यांनी महाविकास आघाडीमधील जागा वाटपाबाबत भाष्य केलं. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी (NCP) व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) या तीन पक्षांची महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आजही भक्कम आहे. मागील तीन वर्षात मविआने भाजपला (BJP) धूळ चारत मोठे यश मिळवले आहे. मविआमध्ये जागा वाटपाविषयी कसलेही मतभेद नसल्याचे नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले.

नाना पटोले (Nana Patole) पुढे म्हणाले, कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका (Karnataka Assembly Elections) संपल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र बसून आगमी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा करतील. सोलापूर लोकसभेची जागा ही काँग्रेसची आहे या मतदारसंघातून मागील अनेक वर्षापासून काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवत आहे आणि ही जागा काँग्रेसकडेच राहील असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तसेच सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष ताकदीने उभा राहत आहे. जिल्ह्यात कोणताही गट-तट नाही, सर्वजण एकसंघपणे काम करत आहे. तरुणांची संख्या मोठी आहे. काँग्रेसमध्ये तरुण मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. जनतेच्या आशीर्वादाने जिल्ह्यात काँग्रेस पक्ष पुन्हा चांगली कामगिरी करेल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून (Solapur Lok Sabha Constituency)
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांनी निवडणूक लढवावी असं आम्हाला वाटतं.
आम्ही त्यांना तशी विनंती करणार आहोत.
ते नाही लढले तर शेवटी त्यांनाच विचारून उमेदवार देऊ असंही नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं.

Web Title :- Nana Patole | Nana Patole’s big statement about seat allocation in Mavia, said- ‘About seat allocation in Mavia…’

हे देखील वाचा :

Abdul Sattar | आमच्या मतावर राज्यसभेवर गेलाय तो महाकुत्रा, संजय राऊतांबद्दल बोलताना सत्तारांची जीभ घसरली

Maharashtra Politics News | ‘राऊतांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही’, नाना पटोलेंचाही राऊतांवर हल्लाबोल

MLA Shashikant Shinde | ‘अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं आम्हाला वाटतं, पण शरद पवार आणि…’, राष्ट्रवादीच्या आमदाराचे विधान

Chandrashekhar Bawankule | ‘शरद पवारांचं राजीनामानाट्य म्हणजे तमाशातील वगनाट्य!’ चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात (व्हिडिओ)

MNS Chief Raj Thackeray | कर्नाटकात कोणाला मतदान करायचं? राज ठाकरेंनी मतदारांना केलं आवाहन

Related Posts