IMPIMP

Nana Patole Viral Video | नाना पटोलेंच्या ‘त्या’ व्हायरल झालेल्या व्हिडीओसंदर्भात रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या – ‘संबंधित पिडिता तक्रार…’

by nagesh
Nana Patole Viral Video | chairperson of maharashtra state women commission rupali chakankar on maharashtra congress leader nana patole cherrapunji viral video

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनNana Patole Viral Video | एक कथित व्हिडिओ शेअर करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Congress Maharashtra State President) नाना पटोले यांचे चारित्र हनन करण्याचा प्रयत्न काही दिवसांपासून सुरू आहे. हा व्हिडिओ चेरापुंजीमधील (Cherrapunji) असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे भाजपा नेत्या चित्रा वाघ (BJP leader Chitra Wagh) यांनी ट्विटरवरून हा व्हिडिओ शेअर करत, काय नाना…तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलात, असे कॅपशन दिले आहे. यावरून वाद निर्माण झाला असून नाना पटोले (Nana Patole Viral Video) यांनी मला बदनाम करण्याचा हा प्रकार असल्याचे म्हटले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या कथित व्हिडिओ प्रकरणावरून (Nana Patole Viral Video) राज्य महिला आयोगाच्या (State Commission for Women) अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या पुण्यात (Pune) जनसुनावणीच्या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होत्या. नाना पटोलेंच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबाबत चाकणकर म्हणाल्या, संबंधित पिडिता राज्य महिला आयोगाकडे तक्रार करतात तेव्हा आम्ही त्याची दखल घेतो. राज्य महिला आयोगाकडे याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही.

चाकणकर पुढे म्हणाल्या, तक्रारी आल्यानंतर त्याची शहानिशा करुन संबंधित पोलिसांना कारवाई करा म्हणून सूचना देतो. राज्य महिला आयोग हा घटनात्मक दर्जाचा विभाग आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता आमच्याकडे आलेली तक्रार, त्यासंबंधित पुरावे यासंदर्भात पोलीस विभागाला (Police Department) सूचना देत असतो.

चित्रा वाघ यांनी 20 जुलै रोजी मुंबईमधील पत्रकार परिषदे म्हटले होते की, नाना पटोलेंचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मला धक्काच बसला. अशा पीडितांनी समोर यावे योग्य ती कारवाई होईल. सकाळपासून हा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नाना पटोले एका महिलेसोबत आहेत. जोपर्यंत सार्वजनिक जीवनामध्ये एखादी गोष्ट येत नाही ती खासगी असते. मात्र जेव्हा ती सार्वजनिक जीवनामध्ये येते तेव्हा लोकप्रितिनिधी म्हणून त्यांना विचारले पाहिजे. त्यानुसार मी त्यांना ट्विट करून विचारले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नाना पटोले यांनी चित्रा वाघ यांच्या आरोपानंतर म्हटले की, हे सगळे प्रकरण आमचे मिडीया सेल बघत आहे.
मी सध्या पूरग्रस्त भागाच्या दौर्‍यावर आहे. आपल्या देशात राजकारणाची पातळी खाली घसरली आहे,
त्याचा हा परिणाम आहे. लोकांसाठी काम करणार्‍यांना बदनाम करण्याचे हे प्रयत्न सुरु आहेत.
यासंदर्भात आमची लीगल टीम कारवाई करत आहे. त्यांच्याबद्दल (चित्रा वाघ यांच्याबद्दल) मला काही बोलायचे नाही. खरे काय ते समोर येईल.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला रोमान्स इन चेरापुंजी, मेघालय असे लिहिले आहे.
एक व्यक्ती एका महिलेच्या गळ्यात हात घालून बसल्याचे दिसत आहे.
व्हिडिओच्या फ्रेम मध्ये, काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, काय आ, नाना एकदम ओके असा मजकूर आहे.
विशेष म्हणजे या व्हिडिओत महिलेच्या खांद्यावर हात ठेवून बसलेला पुरूष आणि महिला दोघांचेही चेहरे दिसत नाहीत.
केवळ व्हिडिओतील पुरूषाचा टीशर्ट आणि नाना पटोले यांचा टीशर्ट मिळता-जुळता असल्याचे दाखवण्यात आले आहे.
यासाठी पुढच्या फ्रेममध्ये टीशर्टमध्ये नाना पटोले दाखवण्यात आले आहेत.
हे फोटो पोलो ऑर्कीड हॉटेलमधील (Polo Orchid Hotel) असल्याचे व्हिडिओत म्हटले आहे.

Web Title :- Nana Patole Viral Video | chairperson of maharashtra state women commission rupali chakankar on maharashtra congress leader nana patole cherrapunji viral video

हे देखील वाचा :

Suhas Kande | त्यावेळी नक्षलवाद्यांनी शिंदेंना हत्येची धमकी दिली; पण, उद्धव ठाकरेंनी त्यांना झेड प्लस सुरक्षा नाकारली

Deepak Kesarkar | दीपक केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ‘उद्धवजींचा नको, अनिल परबांचा फोन तपासा सगळे उघड होईल’

Maharashtra Political Crisis | आदित्य ठाकरेंच्या ठाणे-भिवंडीतील आव्हानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलर्ट! संध्याकाळीच घडवला समर्थकांचा प्रवेश

Related Posts