IMPIMP

Nanded Police | नांदेड पोलीस आयुक्तालयाबाबत लवकरच मंत्रीमंडळापुढे प्रस्ताव सादर करू – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

by Team Deccan Express
Nanded Police | We will soon submit a proposal to the Cabinet regarding Nanded Police Commissionerate Home Minister Dilip Walse Patil

सरकारसत्ता ऑनलाइन  टीम – Nanded Police | नांदेड येथील वाढलेली लोकसंख्या आणि वाढते महानगर लक्षात घेता येथे पोलीस आयुक्तालयाची मागणी (Demand Of Police Commissioner office In Nanded) अनेक दिवसांपासून आहे. याबाबत प्रस्ताव शासनाकडे (Maharashtra State Government) विचाराधीन आहे. आज झालेल्या बैठकीत याबाबत विचार विनिमय करण्यात आला. (Nanded Police)

नांदेड जिल्ह्यात आज घडीला 36 पोलीस स्टेशन (36 Police Stations In Nanded District) आहेत तर महानगरामध्ये 12 – 14 पोलीस स्टेशन आहेत. एका पोलीस अधिक्षक कार्यालयासाठी (Nanded SP Office) हा मोठा भार आहे. नांदेड जिल्हा आणि महानगरातील पोलीस स्टेशनची संख्या लक्षात घेऊन नांदेडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय बाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील (Maharashtra Home Minister Dilip Walse Patil) यांनी सांगितले.

नांदेड परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थेचा (Law And Order In Nanded Range) आढावा त्यांनी गृहविभागाच्या बैठकीत घेतला.
अधिकाऱ्यांकडून सर्व माहिती समजून घेतली. त्यानंतर दुपारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
नांदेड येथील बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी (Builder Sanjay Bhiyani Murder Case)
यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. महाराष्ट्रातील पोलीस (Maharashtra Police) तपासासाठी सक्षम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मी बियाणी कुटुंबियांचीही आज भेट घेऊन त्यांचे म्हणणे समजून घेतले.
आरोपी विरुद्ध तपास योग्य त्या दिशेने सुरू असून गुन्हेगारांविरुद्ध लवकरच कारवाई केली जाईल
असा विश्वास मी त्यांना दिल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गुन्हे सिद्धतेचे प्रमाण हे अचूक झाले पाहिजे.
याचबरोबर याचे प्रमाणही अधिक वाढले पाहिजे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Web Title :- Nanded Police | We will soon submit a proposal to the Cabinet regarding Nanded Police Commissionerate Home Minister Dilip Walse Patil

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts