IMPIMP

Nandurbar ACB Trap | दहावीचे मार्कशीट देण्यासाठी विद्यार्थ्याकडून लाच घेताना मुख्याध्यापक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

नंदुरबार : सरकारसत्ता ऑनलाईन   शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate) व मार्कशीट (Marksheet) देण्यासाठी विद्यार्थ्याकडून सुरवातीला 5 हजार रुपये लाच घेतली. (Accepting Bribe) त्यानंतर पुन्हा 1600 रुपये लाच घेताना शाळेच्या मुख्याध्यापकाला नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nandurbar ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. नवापूर तालुक्यातील सुळी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदलाल शांताराम शिनकर Principal Nandlal Shantaram Shinkar (वय-47 रा. रा. – ५२, साईनगरी ,‌मेन रोड, नवापूर) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. नंदुरबार एसीबीच्या पथकाने (Nandurbar ACB Trap) ही कारवाई मंगळवारी (दि.17) केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील 35 वर्षीच्या व्यक्तीने नंदुरबार एसीबीकडे (Nandurbar ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार यांनी 2017-18 यावर्षी माध्यमिक विद्यालय सुळी येथे इयत्ता दहावीचे शिक्षण घेतले आहे. तक्रारदार यांचा शाळा सोडल्याचा दाखला व मार्कशीट देण्यासाठी मुख्याध्यापक नंदलाल शिनकर यांनी 14 जानेवारी रोजी पाच हजार रुपये घेतले. मात्र शाळा सोडल्याच्या दाखल्यावर त्यांच्या आईचे नाव चुकीचे असल्याने ते दुरुस्त करुन देण्याची मागणी तक्रारदार यांनी केली.

यावेळी मुख्याध्यापक शिनकर यांनी तक्रारदाराकडून शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील आईचे नाव दुरुस्त
करून देण्यासाठी व नाशिक येथील बोर्ड कार्यालयातून त्यांचे मार्कशीट आणून देण्यासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी नंदुरबार एसीबीकडे तक्रार केली. पथकाने मंगळवारी पंचासमक्ष पडताळणी केली असता मुख्याध्यापक नंदलाल शिनकर यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर सापळा करवाई दरम्यान शिनकर यांना तक्रारदार यांच्याकडून 1600 रुपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात
आले. नंदलाल शिनकर यांच्यावर नवापूर पोलीस ठाण्यात (Nawapur Police Station)
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde)
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबी नंदुबारचे पोलिस
उप अधीक्षक राकेश चौधरी (DySP Rakesh Chaudhary), पोलीस निरीक्षक समाधान एम.वाघ
(Police Inspector Samadhan Wagh), पोलीस अंमलदार विजय ठाकरे, अमोल मराठे, देवराम गावित
यांच्या पथकाने केली.

Web Title :- Nandurbar ACB Trap | Principal caught in anti-corruption net while taking bribe from student to give 10th mark sheet

हे देखील वाचा :

Sanjay Raut | निवडणुक आयोगातील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Maharashtra Politics | ‘आमच्याकडे बहुमत असल्याने लवकर निर्णय घ्या..,’ शिंदे गटाचा निवडणुक आयोगासमोर दावा

Maharashtra Politics | ‘औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरे गटाचा खासदार होणार, चंद्रकांत खैरेंनी जाती-जीतींमध्ये भांडणं लावली’, शिंदे गटाच्या नेत्याचे गंभीर आरोप

Related Posts