IMPIMP

Nandurbar Crime News | नंदुरबारमध्ये ‘पुष्पा’ स्टाईलने सागाची तस्करी; जमिनीखाली गाडली होती सागाची लाकडे

by nagesh
Nandurbar Crime News | nandurbar forest department give jolt to pushpa seized 12 teak wood blocks buried in farm land

नंदुरबार : सरकारसत्ता ऑनलाईन – Nandurbar Crime News | नंदुरबार येथे पिकपेराच्या मातीत सागवानी लाकडे लपून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावर वनविभागाकडून धाड टाकत सुमारे अडीच लाख रूपये किंमतीचा सागवान लाकडांचा साठा जप्त करण्यात आला. (Teak Wood Smuggling) ही जप्तीची कारवाई वनविभागाकडून हुमाफळी गावशिवारात केली गेली आहे. यावेळी ‘पुष्पा’ चित्रपटाप्रमाणे चोरी झाल्याचे पाहून वनविभाग अधिकारी देखील चक्रावून गेले. (Nandurbar Crime News)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

जमीनीखाली ही सागाची लाकडे गाडण्यात आली होती. त्यामुळे वनविभागाला जेसीबीच्या सहाय्याने खोदून ही लाकडे बाहेर काढावी लागली. वनविभाच्या या कारवाईचे सर्वच स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. मात्र त्याच वेळी पुष्पा स्टाईलने लाकूड तस्करी करणारा हा पुष्पा कोण? असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. (Nandurbar Crime News)

नंदुरबार जिल्ह्याचा नवापूर तालुका हा गुजरात राज्य सीमेलगत असल्याने या परिसरात अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. हा परिसर हा वनक्षेत्रात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वनविभागाच्या (Forest Department) अधिकाऱ्यांचा फौजफाटा या परिसरात गस्त घालत असतात. त्यामुळे इथे नेहमीच छोट्या मोठ्या कारवाया समोर येत असतात. गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांच्या सीमा या भागात असल्याने त्याचाच फायदा उचलत मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक येथे होत असते. या परिसरातून सागवान या महागड्या लाकडाबरोबरच मोदल, चिंच, लिंब, बोर, हिवर यांसारख्या देखील लाकडांची तस्करी या परिसरात होत असते. (Nandurbar News)

त्यातच नवापूर येथील हमाफळी गावालगत नाल्यामध्ये पिकपेरा करण्यात आला होता.
या पिकपेरा केलेल्या नाल्याच्या मातीत सागवानी लाकडे लपून ठेवण्यात आली होती.
पाहणी दरम्यान, वनविभागाच्या लक्षात ही बाब आल्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या
सहाय्याने खोदून ही लाकडे बाहेर काढली. यात सागवनी लाकडाचे १२ नग वनविभागाच्या हाती लागले.
त्याची किंमत जवळपास अडीच लाख एवढी असल्याचे सांगण्यात येत आहे.
लाकूडसाठा जप्त केल्यानंतर नवापूर शासकीय विक्री आगारात जमा करण्यात आला.
ही कारवाई धुळ्याचे वनसंरक्षक हौसिंग, नंदुरबारचे उपवनसंरक्षक कृष्णा भवर, धुळे दक्षता पथकाचे
विभागीय वनाधिकारी संजय पाटील, नंदुरबारचे सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार,
यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल अवसरमंल,
चिंचपाड्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश चौधरी, सहाय्यक वनसंरक्षक पर्यविक्षाधीन गणेश मिसाळ,
नवापूर वनपरिक्षेत्र व चिंचपाड्याचे पथकाने ही कारवाई केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Nandurbar Crime News | nandurbar forest department give jolt to pushpa seized 12 teak wood blocks buried in farm land

हे देखील वाचा :

Cabinet Expansion | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर जाताच, आमदारांना लागले मंत्रीपदाचे वेध

Nagpur Politics | नागपूरात शिनसेनेच्या दोन्ही गटांमध्ये रंगली कार्यकर्ते पळविण्याची स्पर्धा; कोण कोणत्या गटाचा यामध्ये संभ्रम

Pune Crime News | 500 रुपयासाठी व्यावसायिकाचा सपासप वार करुन खून, आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; पुणे जिल्ह्यातील घटना

Related Posts