IMPIMP

Nandurbar Police | खाकी वर्दीची अशीही सेवा, मृतदेहांची हेळसांड थांबवण्यासाठी अंत्यसंस्कारासाठी दिली 4 टन लाकडे; नंदुरबार पोलिसांचा सुत्य उपक्रम

by nagesh
Nandurbar Police | A similar service in khaki uniforms, 4 tons of wood provided for cremation to stop the trail of dead bodies; Nandurbar police Sutya initiative

नंदुरबार : सरकारसत्ता ऑनलाईन – गेल्या आठवडय़ापासून नवापूर येथील स्मशानभूमीत (Cemetery) अंत्यसंस्कारासाठी (Funeral) लाकडेच
नसल्याने स्मशानभूमीत आणलेले मृतदेह (Dead Body) ताटकळत ठेवण्यात येत होते. मृतदेहांची हेळसांड होत असलेने मृतांच्या नातेवाईकांसोबतच
नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत होता. प्रसारमाध्यमांतून याबाबत वृत्त समजताच नंदुरबारच्या जिल्हा पोलिसप्रमुख यांनी (Nandurbar Police)
नवापूर पोलीस स्टेशनचे (Nawapur Police Station) पोलीस निरीक्षक यांना तातडीने हालचाल करण्याच्या सूचना दिल्या. यावर उपाययोजना करत पोलिसांनी (Nandurbar Police) स्मशानभूमी येथे लाकडे उपलब्ध करुन दिली.

पोलीस अधीक्षकांसह (Nandurbar SP) नवापूर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढून सुमारे
चार टन लाकडे उपलब्ध करून दिली. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी खोळंबलेल्या मृतदेहांना अग्निडाग मिळाला.
नागपूर परिसरात लाकडे उपलब्ध नसल्याने गुजरात राज्यातून पोलीसांनी ही लाकडे उपलब्ध करुन दिली आहेत.

खाकी वर्धीची अशी सेवा पाहून नवापूर परिसरातील मृतांच्या नातेवाईकांनी साश्रूनयनांनी पोलिसांचे आभार मानले.
नंदुरबार पोलिसांनी (Nandurbar Police) मानवाच्या अंतिम प्रवासादरम्यान असा वेगळा माणुसकीचा
धर्म निभावला आहे. मात्र पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील (Superintendent of Police P.R. Patil),
उपअधीक्षक सचिन हिरे (Sub Divisional Police Officer Sachin Hire),
पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे (Police Inspector Dnyaneshwar Vare) या पोलीस टीमने हे आपले
कर्तव्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.

Web Title :- Nandurbar Police | A similar service in khaki uniforms, 4 tons of wood provided for cremation to stop the trail of dead bodies; Nandurbar police Sutya initiative

हे देखील वाचा :

Radish | मुळा खाल्ल्याने या ४ प्रकारच्या लोकांना होऊ शकतो त्रास; पूर्णपणे टाळा

Pune Crime | अतिक्रमण विरोधात तक्रार दिल्याच्या रागातून टोळक्याकडून पत्रकारावर हल्ला, मुंढवा परिसरातील घटना

Hair Care | पाहिजे असतील रेखासारखे सुंदर केस; स्वयंपाक घरातील या 4 वस्तूंचा करा वापर

Related Posts