IMPIMP

Nandurbar Police | नंदुरबार पोलीसांचा माणुसकीचा हात ! पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील म्हणाले – ‘तुमचे चोरीला गेलेले पैसे आम्ही शोधून देऊच पण… ‘

by nagesh
 Nandurbar Police | Nandurbar police's hand of humanity! Superintendent of Police P.R. Patil said - 'We will find your stolen money but ...'

सरकारसत्ता ऑनलाइन -Nandurbar Police | मागील दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे (Coronavirus) अनेकांचे जगणे मुश्किल झाले आहे. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला तर अनेकांना आपल्या पालकांना, नातेवाईकांना गमवावे लागले. काहींचे तर घरात दोन टाळकी असलेले एक सोबत निघून गेले. यानंतर आता खायचे काय? हाच प्रश्न सतत डोक्यात घोघांऊ लागला. अशीच एक घटना नंदुरबार जिल्ह्यातील (Nandurbar Police) शहादा तालुक्यातील (Shahada) अठराविश्व दारिद्र्य असलेल्या पदम हारचंद कोळी Padam Harchand Koli (वय 75 रा.डामरखेडा ता. शहादा) यांची आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या (Sanjay Gandhi Niradhar Yojana) मदतीवर अवलंबून असलेले जीवन अशातच पत्नीला कोरोना झाला. कोरोना उपचाराच्या खर्चामुळे हतबल झालेला संसार मोडकळीस आला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तोडका-मोडका संसार चालला होता. अशातच मागील कोरोनाच्या महामारीत पत्नीचे निधन झाले (Wife Died) आणि होता नव्हता तोही संसार मोडकळीस झाला. पदम कोळी (Padam Koli) यांना साथ देणारी पत्नी त्यांची सोडून गेली. अशा वृद्धापकाळात जगायचं कसं? हाच प्रश्न समोर पडला. हलाखीचे जीवन जगत असताना पत्नीच्या कोरोनामुळे निधन झाल्याने शासकीय योजनेतून पन्नास हजार रूपये (Fifty Thousand Rupees) मंजूर झाल्याचे कळले. आणि सरकारी मदतीच्या रूपाने आपल्यापर्यंत काहीतरी मदत पोहचली त्यामुळे चेहऱ्यावर हसु तरी उमटले. (Nandurbar Police)

पदम कोळी हे धावत पळत प्रकाशा येथील स्टेट बँकेत गेले. मिळालेले 50 हजार त्याने बॅंकेतून काढून घेतले. पैशाची पिशवी पत्नीच्या आठवणीने भरल्या डोळ्यांना लावली. तशीच पिशवी घेऊन घराची वाट पकडली. घरी जाता जाता मध्येच एका हॅाटेलवजा टपरीवर पाणी पिण्यासाठी थांबले. सरकारची मदत मिळाल्यानंतर पदम थोडे आराम झाले होते. तितक्यात चोरट्याने पिशवीवर डल्ला मारला. इकडे आराम मिळाला तर दुसरीकडे पैशाची पिशवी गायब झाली. आयुष्यातील पहिली मोठी रक्कम हातात होती, तीही निघून गेली. हुंदका अगदी गळ्यातून दाटून आला. नशीबाला दोष देत ते घराच्या वाटेला लागले.

दरम्यान, मदतीची जी आस नव्हती ती पुन्हा धावून पदम यांच्याकडे आलीच. आज वृत्तपत्रात बातमी वाचून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील (SP P. R. Patil) यांनी पदम कोळी यांना प्रत्यक्षरित्या बोलविण्याबाबत शहादा पोलिस ठाण्याचे (Shahada Police Station) पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत (Police Inspector Deepak Budhwant) यांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी पदम यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले. कालच्या धक्क्यातून अजूनही ते सावरले नव्हते. पोलीस स्टेशनला तक्रारही दाखल केली होती. मात्र डायरेक्ट पोलीस अधीक्षकांनी (SP) का बोलावले यामुळे ते थोडे घाबरले होते. त्या ठिकाणी येताच पदम यांना एक धक्का बसला. तो सुखद धक्काच…!

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलीस अधीक्षकांनी पदम यांच्या हातात 50 हजार रुपये ठेवले.
आणि एसपी म्हणाले, ”तुमचे चोरीला गेलेले पैसे आम्ही शोधून देऊच परंतु माझ्या सहकारी पोलिसांनी तुमच्यासाठी वर्गणी काढून पैसे जमवले आहेत
त्याचा स्वीकार करा” म्हणत थेट पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील (Superintendent of Police P.R. Patil) यांनी त्यांना विनंती केली.
माणुसकीच्या भावनेतून पोलिसांनी जमा केलेले पैसे स्विकारताना पदम यांचा हुंदका दाटला.
त्याक्षणी एका वृद्धाचे लुटलेले समाधान वर्गणी काढून परत करताना उपस्थित पोलीसांना देखील गहिवरून आले.

पोलिसांनी दाखवलेले माणुसकीचे सहकार्य आणि त्या वृद्धाला दाटलेला आनंद गगनात मावत नव्हता.
पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील (P.R. Patil) यांच्या संकल्पनेतून अपर पोलीस अधिक्षक विजय पवार (Addl SP Vijay Pawar),
शहाद्याचे पोलीस उपअधीक्षक श्रीकांत घुमरे (DySP Shrikant Ghumre),
एल.सी.बी. चे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर (LCB Police Inspector Ravindra Kalmakar),
पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत (Police Inspector Deepak Budhwant), वाचक अर्जुन पटले (Arjun Ptatle)
आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी (Police Personnel) त्या वृद्धास ही एक मोलाची आणि माणुसकीची मदत केली.
आणि पोलीसातील माणुसकीचा संदेश करून दिला.

”सोडून गेलेली पिशवी तर मिळाली नाही पण… पोलिसांनी दाखवलेला माणुसकीचा हात मात्र त्यांना नक्कीच मिळाला.”
चेहऱ्यावर आनंद घेत घरी जाता जाता पदम कोळी म्हणाले.. ”आता चार दिवस जास्त जगेन”
..पण..त्या जगण्यात आणि त्यांच्या आनंदात नंदुरबार पोलीसांचा सहभाग होता..!!

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Nandurbar Police | Nandurbar police’s hand of humanity! Superintendent of Police P.R. Patil said – ‘We will find your stolen money but …’

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात पत्नीच्या मदतीने 27 वर्षाच्या तरुणीचे न्यूड फोटो व्हायरल करुन बदनामी अन् बलात्कार; पाषाण परिसरातील घटना

7th Pay Commission Updates | मोदी सरकार देणार 2 लाख रुपयांपर्यंतची भेट ! 1 कोटीपेक्षा जास्त लोकांना होईल फायदा

Divyang Pension Yojana | कोणत्या लोकांना मिळतात ‘या’ पेन्शनचा लाभ, जाणून घ्या योजनेची सविस्तर माहिती

Related Posts