IMPIMP

Nandurbar Police | अपघातात मृत्यू झालेल्या पोलिसाच्या कुटुंबाला नंदुरबार पोलिसांकडून 6.5 लाखाची मदत, 11 लाख 46 हजार 948 रुपयांचे जप्त केलेले 110 मोबाईल मूळ मालकांना IG बी.जी. शेखर पाटील यांच्याहस्ते सुपुर्द

by nagesh
Nandurbar Police | The family of the policeman who died in the accident received Rs 6.5 lakh from Nandurbar police and 110 mobile of Rs 11 lakh 46 thousand 948 was Handed over to owner

नंदुरबार : सरकारसत्ता ऑनलाइन – Nandurbar Police | नंदुरबार जिल्हा पोलीस (Nandurbar Police) दलातील पोलीस अंमलदार निलेश माणिक पावरा (Nilesh Manik Pavara) यांचे तळोदा पोलीस ठाण्याच्या (Taloda Police Station) हद्दीत दुर्दैवी अपघाती निधन (Accidental Death) झाले होते. कमी वयात पावरा यांचे निधन झाल्याने पोलीस अधीक्षक पी.आर पाटील (Superintendent of Police PR Patil) यांनी जिल्हा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार जमा झालेल्या 6 लाख 53 हजार 737 रुपयांचा धनादेश (Check) पावरा यांच्या कुटुंबाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महारिनिक्षक डॉ. बी.जी शेखर पाटील (Special Inspector General of Police of Nashik Range B.G. Shekhar Patil) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्वत: पोलीस अधीक्षक पी.आर पाटील यांनी 10 हजार रुपयांची मदत केली.

तसेच नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोबाईल चोरीच्या गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर (Local Crime Branch (LCB) Police Inspector Ravindra Kalamkar) यांनी माहिती घेऊन गुन्ह्याचा तपास केला. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील दाखल तक्रारीचे तांत्रिक विश्लेषण करुन नंदुरबार, धुळे (Dhule), जळगाव (Jalgaon) व गुजरात (Gujarat), मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) आरोपींचा शोध घेऊन 11 लाख 46 हजार 948 रुपयांचे 110 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेले मोबाईल मुळ तक्रारदाराला बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते परत करण्यात आले.

शहादा तालुक्यातील डामरखेडा येथील 75 वर्षीय पदम हरचंद कोळी (Padam Harchand Koli) यांच्या पत्नीचे कोरोनामुळे (Corona) निधन झाले आहे. पत्नीच्या निधनानंतर शासकीय योजनेतुन मिळालेले 50 हजार रुपये बँकेतून काढून घरी जात असताना अज्ञात व्यक्तीने पैसे चोरून नेले होते. या गुन्ह्याचा तपास करुन नंदुरबार पोलिसांनी (Nandurbar Police) आरोपीला अटक करुन 50 हजार रुपये जप्त केले होते. जप्त करण्यात आलेले पैसे न्यायालयाच्या आदेशाने पदम कोळी यांना बी.जी. शेखर पाटील यांच्याहस्ते परत करण्यात आले.

त्याचप्रमाणे नवापुर तालुक्यातील पानबारा येथील शासकीय माध्यमीक शाळेतून 2 लाख 64 हजार रुपये किमतीचे 22 लॅपटॉप चोरीला गेले होते. नवापूर पोलिसांनी (Navapur police) या गुन्ह्याचा तपास करुन 48 तासाच्यात गुन्हा उघडकीस आणून मुद्देमाल जप्त केला होता. जप्त केलेला मुद्देमाल पानबारा आश्रम शाळेचे मुख्याध्यापक पी.पी. वसावे याच्याकडे बी.जी शेखर पाटील यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आला.

बी.जी शेखर पाटील म्हणाले, मयत अंमलदार निलेश पावरा यांच्या परिवारास जिल्हा घटकातील अधिकारी व अंमलदार यांनी मदत निधी जमा करुन केलेल्या मदतीने समाजात पोलिसांबद्दल चांगला संदेश जाईल. तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व नंदुरबार पोलिसांनी चांगला पायंडा पाडला असल्याचे ते म्हणाले.

यावेळी पोलीस अधीक्षक पी.आर पाटील म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यात कार्यरत पोलीस अधिकारी व अंमलदार यांना
सोबत घेऊन समाजभिमुख पोलिसींग करण्यासाठी तसेच लहान बालके, वृद्ध, महिला व इतर दुर्बल वंचित घटक
यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा पोलीस दल कटीबद्ध राहील असे आश्वासन त्यांनी दिले.

या कार्यक्रमाला पोलीस उप महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक बी.जी. शेखर पाटील,
नंदुरबारचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील (SP P.R. Patil),
अपर पोलीस अधीक्षक विजय पवार(Addl SP Vijay Pawar),
पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय) विश्वास वाळवी (DySP vishwas valvi),
पोलीस उप अधीक्षक आत्माराम प्रधान (DySP Atmaram Pradhan),
उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे (Sub Divisional Police Officer Sachin Hiray),
उप विभागीय पोलीस अधिकारी शहादा श्रीकांत घुमरे (Sub Divisional Police Officer Shahada Srikant Ghumre),
पोलीस उप विभागीय अधिकारी अक्कलकुवा संभाजी सावंत (Sub Divisional Police Officer Akkalkuwa Sambhaji Sawant)
यांच्यासह पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Web Title :- Nandurbar Police | The family of the policeman who died in the accident received Rs 6.5 lakh from Nandurbar police and 110 mobile of Rs 11 lakh 46 thousand 948 was Handed over to owner

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

Nandurbar Police | ‘आपले पोलीस’ योजनेंतर्गत नंदुरबार पोलीस दलाला 4 नवीन वाहने, IG बी.जी. शेखर पाटील यांनी दाखविला हिरवा झेंडा

Nandurbar Police | नंदुरबार पोलीस अधीक्षकांच्या निजी कक्षाचे IG डॉ. बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 60 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts