IMPIMP

Narayan Rane | वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या युतीवर नारायण राणे यांचा ‘प्रहार’; म्हणाले…

by nagesh
Narayan Rane | bjp narayan rane slams uddhav thackeray on calling devendra fadnavis fadtus

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Narayan Rane | राज्याच्या राजकारणात आज (दि.२३) एक नवीन समिकरण जुळून आलं आहे. शिवसेना ठाकरे
गट (Shivsena Thackeray Group) आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) यांच्यातील युतीची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून करण्यात आली. जवळपास २ महिन्यांपासून उभय पक्षांत चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. आज अखेर
त्यांना पूर्णविराम लागला. शिवसेनेची शिवशक्ती आणि वंचितची भीमशक्ती एकत्र आल्यामुळे राज्याच्या राजकारणात एक नवी नांदी सुरू झाल्याचे
बोलले जात आहे. शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी टीका केली
आहे. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाना साधला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर बोलताना नारायण राणे म्हणाले की, ‘ मुळात प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे आस्तित्व काय आहे? राज्यात आता शिवशक्ती कुठे राहिली आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेत १२ देखील आमदार राहिले नाहीत.’ असा टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रकाश आंबेडकर यांची टीका करायची लायकी नाही.
असे देखील नारायण राणे (Narayan Rane) यावेळी बोलताना म्हणाले.
प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही युतीची घोषणा करतेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर
टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाचाही एकदिवस अंत होईल,
असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले. यावरून नारायण राणे यांनी या दोन्ही नेत्यांवर जोरदार टीका केली.
राज्यात शिवशक्ती तर नाहीच. भीमशक्ती देशात आहे पण प्रकाश आंबेडकरांकडे किती आहे?
त्यांनी किती दलितांची घरे बसविली? मी सांगतो मी किती जणांची घरे बसवली.. अशी टीका नारायण राणे
यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

‘शिवसेना पक्ष आणि वंचित एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणावर त्याचा काहीही परिणाम होत नाही.’ असे देखील यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले. तसेच यावेळी बोलताना नारायण राणे यांनी महाविकास आघाडीबाबत देखील एक प्रश्न उपस्थित केला. नारायण राणे म्हणाले की, ‘प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची तर युती झाली, पण महाविकास आघाडीचे काय? महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांची वंचितशी युती झाली आहे का?’ असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, महाविकास आघाडीतील घटकपक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी यावर बोलणे टाळले. तर काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी यावर बोलताना म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांचा प्रस्ताव अजून तरी आमच्याकडे आला नाही. प्रस्ताव आल्यावर आम्ही निर्णय घेऊ. अशी सावध प्रतिक्रिया दिली. त्यावरून महाविकास आघाडीतील समन्वयाबाबत राजकीय वर्तुळातील चर्चांना उधान आले आहे.

Web Title :- Narayan Rane | bjp narayan rane reaction on shivsena vanchit alliance uddhav thackeray and prakash ambedkar

हे देखील वाचा :

Weight Loss | लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्या दुधी भोपळ्याचे सूप, सोबतच आरोग्याला होतील अनेक फायदे!

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; पुनित बालन-केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी, न्युट्रीलिशियस् संघांची विजयी घौडदौड !!

Diarrhea in Children | मुलांच्या डायरियाच्या समस्येकडे करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या 5 लक्षणे आणि उपचार

Related Posts