IMPIMP

Narayan Rane On Uddhav Thackeray | …तर कायमचं बोलणं बंद करु; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंना थेट धमकी, म्हणाले – संजय राऊतांच्या सोबतीला जेलमध्ये जाल

by nagesh
Narayan Rane On Uddhav Thackeray | union minister narayan rane has warned former cm uddhav thackeray and shivsena

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Narayan Rane On Uddhav Thackeray | भाजपा (BJP), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि सहकार्‍यांच्या केसाला जरी धक्का लागला तर, महाराष्ट्रात तुम्हाला फिरु देणार नाही. भाजपाच्या कोणत्याही नेत्यांवर टीका केली, तर जसास-तसे उत्तर देणार नाही, तर कायमचे बोलणं बंद करु, अशी थेट धमकी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांना दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी काल गोरेगाव येथे गटप्रमुखांच्या जाहीर सभेत एकनाथ शिंदे आणि भाजपा नेतृत्वावर जोरदार टीका केली होती. यावरून राणे (Narayan Rane On Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही धमकी दिली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नारायण राणे म्हणाले, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता गटनेत्यांपर्यंत येऊन पोहोचले आहेत. त्याआधी मंत्र्यांनाही भेट द्यायचे नाहीत. आता मेळावा घेत आहेत. उद्धव ठाकरे यांना केंद्रीय मंत्री अमित शाह (Union Minister Amit Shah) यांचा मुंबई दौरा का भोवला?, अमित शाह हे देशाचे गृहमंत्री, ते कुठेही जातील.

राणे पुढे म्हणाले, मराठी माणसाला हद्दपार करण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचाच हात आहे. त्यांनी मराठी माणसाच्या हिताचे बोलू नये. उद्धव ठाकरेंनी किती मराठी लोकांना रोजगार दिला. काल जे काही बोलले आहेत, खोका, गिधाडं आत जाल. संजय राऊतांची (Sanjay Raut) सोबत करायला. खोक्याची चौकशी होणार आहे, यांच्या मागे ईडी (ED) लागणार आहे. गद्दारांना दूध पाजले म्हणणार्‍या उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना खोक्याच्या रुपात तूप खाल्ले. तुम्ही शिवसेना पक्ष वाढीसाठी काही केले का? आयत्या बिळावर ते नागोबा आहेत.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे…

हिंमत असेल, तर पुढच्या महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक (Mumbai Municipal Election) घ्या आणि आणखीच हिंमत असेल, तर त्या सोबतच विधानसभेची निवडणूक (Assembly Elections) घेऊन दाखवा.

आम्हाला जमीन दाखविण्याची भाषा करता, आम्ही तुम्हाला आसमान दाखविल्याशिवाय राहणार नाही,
असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

वेदांतबाबत (Vedanta) धादांत खोटे बोलत आहात, धारावीतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रही गेले. कोणाची बाजू घेऊन बोलत आहात? होय महाराजा, म्हणत दिल्लीचे मिंधे झाला आहात.

सगळे मिळून शिवसेना संपवायला निघाले आहेत, सोबत मुन्नाभाई (राज ठाकरे) घेतला आहे.
शिवसैनिकांमध्येच रक्तपात घडवायचा आणि स्वत: साफ राहायचे, असे भाजपचे चालले आहे.
शिवसेनेच्या वाट्याला जाऊ नका.

Web Title :- Narayan Rane On Uddhav Thackeray | union minister narayan rane has warned former cm uddhav thackeray and shivsena

हे देखील वाचा :

MNS On Sharad Pawar | शरद पवारांना मनसेचे प्रत्युत्तर, मौका सभी को मिलता है, आज बोटं मोजताय, उद्या…

Narayan Rane | सत्तेचं दूध पाजलं म्हणणाऱ्यांनी सत्तेत खोक्याच्या रुपात तूप खाल्लं, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार (व्हिडिओ)

Narayan Rane On Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्यामागे ईडी लागणार; नारायण राणे यांनी थेट दिला इशारा, आत जाल…

Related Posts