IMPIMP

Narendra Patil | ‘शरद पवारांना जाणता राजा पदवी द्यायला ते कुठे लढायला गेले होते?’ मंगलप्रभात लोढा वक्तव्याप्रकरणी नरेंद्र पाटलांचा सवाल

by nagesh
Narendra Patil | narendra patil criticism of sharad pawar over chhatrapati shivaji maharaj

सातारा : सरकारसत्ता ऑनलाईन   महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे
महाराष्ट्रात राजकीय वादळ उठले आहे. मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या वक्तव्याचा जोरदार निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करताना दिसत आहे. त्यानंतर,
काल (१ डिसेंबर) पत्रकार परिषद घेत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी राज्याचे
पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. नरेंद्र पाटील (Narendra Patil) म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवारांना ‘जाणता
राजा’ म्हटले जाते. मग एखाद्या राज्यकर्त्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याशी केली तर त्यामध्ये काही गैर नाही.”

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

“शरद पवार यांना (Sharad Pawar) जाणता राजा ही पदवी दिली जाते. मात्र, ते कुठे लढायला गेले होते?” असा प्रश्न नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी विचारला. कार्यकर्त्यांनी नेत्यांना पदवी देताना शब्दांचा योग्य वापर करावा, असे मतंही त्यांनी व्यक्त केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मर्जीतील माणूस म्हणून नरेंद्र पाटलांकडे पाहिले जाते. नरेंद्र पाटील मराठा समाजातील मोठे नेते मानले जातात.

मंगलप्रभात लोढा यांनी शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाला शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची उपमा दिली होती.
त्यानंतर त्यांच्या विधानाचा सर्व महाविकास आघाडीने निषेध केला.
त्यानंतर भाजपने या विधानाची टीका न करता मंगलप्रभात लोढांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्धार केल्याचे दिसते.
त्यामुळे त्यांनी शरद पवारांना निशाण्यावर ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला आहे.

Web Title :- Narendra Patil | narendra patil criticism of sharad pawar over chhatrapati shivaji maharaj

हे देखील वाचा :

Pune Accident News | अष्टविनायक महामार्गावर काळाचा कुटुंबियांवर घाला; ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत 3 जण ठार

Pune Health News | चिंताजनक ! पुण्यात आढळला ‘जॅपनीज इन्सेफेलायटीस’ (जेई) अर्थात मेंदूज्वराचा रुग्ण

Sushma Andhare | ‘लढाई दोन वाघांची आहे ना; मग कुत्रे का फायदा घेत आहेत?’ – सुषमा अंधारे

Related Posts