IMPIMP

Naresh Mhaske | श्रीनगर परिसरात झालेल्या लाठीमाराची चौकशी करण्यासाठी शिंदे गटाकडून पोलीस आयुक्तांना निवेदन

by nagesh
Naresh Mhaske | cm eknath shinde group naresh mhaske mocks sharad pawar sanjay raut sushma andhare

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena) पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी पोलीस आयुक्तांना श्रीनगर येथे झालेल्या लाठीमाराची चौकशी करण्याचे निवेदन दिले आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राजन विचारे (Rajan Vichare) यांच्या कार्यकर्त्यांनी एका कार्यक्रमात घुसून धूडगूस घातला होता, असा आरोप नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केला आहे.

सोमवारी सायंकाळी भटवाडी, श्रीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात खासदार राजन विचारे यांच्यासोबत आलेल्या समर्थकांनी आमच्या पक्षाचे माजी नगरसेवक योगेश जानकर (Yogesh Jankar) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत विभागात असलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात मारामारी, शिविगाळ, धक्काबुक्की केली, असे म्हस्के यांनी सांगितले. तसेच आम्ही त्याचा जाब विचारण्यासाठी गेलो असता, त्यानी अरेरावी केली. खासदार राजन विचारे आणि संजय घाडीगांवकर यांच्यासोबत आलेल्या समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अश्लील भाषेचा वापर करुन घोषणा दिल्या, असेही म्हस्के यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरील अश्लील घोषणांचा जाब विचारण्याकरिता विभागातील नागरिक श्रीनगर पोलीस ठाण्यात गेले. यावेळी तिथे खासदार राजन विचारे यांच्यासोबत 40 ते 50 समर्थक अगोदरच येऊन बसले होते. याबाबत तक्रार दाखल करण्याकरिता आलेल्या नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण होऊन जमाव आक्रमक होवू लागला. आम्ही सर्व प्रकार उपस्थित असलेल्या पोलीस अधिका-यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी राजन विचारे यांच्या समर्थकांना समज दिली.

तरीसुद्धा त्यांच्याकडून वारंवार हे कृत्य होत होते.
त्यामुळे जमाव अधिकच संतापला आणि त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली.
त्याक्षणी श्रीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात पोलीसांनी लाठ्यांनी तसेच लाकडी बॅटने लोकांना मारण्यास
सुरूवात केली. या लाठीमारात कित्येकांचे डोके फुटले असून, अनेकांना मुका मार लागलेला आहे.
पोलीसांच्या कृतीतून कोणा एका गटाची बाजू घेऊन लाठीमार केला असल्याचे दिसून येते.
त्यामुळे सदर लाठीमाराची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही पोलिसांना केली
असल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितले.

Web Title :- Naresh Mhaske | A statement from the Shinde group to the Police Commissioner to inquire into the lathi-charge that took place in Srinagar area

हे देखील वाचा :

Pune Accident | कॅमेरात कैद झाल्या ठिणग्या; पुणे-अहमदनगर महामार्गावर एक भयानक अपघात

Pune DCP Internal Transfer | पुणे पोलीस आयुक्तालयात नव्याने हजर झालेल्या 7 पोलीस उपायुक्तांच्या नियुक्त्या तर 2 उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या

Abu Azmi | समाजवादी पक्षाचे अबू आझमी अमरावती दौरा रद्द करून मुंबईला रवाना; घरी आयटी किंवा ईडीचे छापे पडल्याची चर्चा

Pune Crime | पुण्यातील बुधवार पेठीतील क्रांती चौकात दोन गटांत कोयत्याने मारामारी

Related Posts