IMPIMP

Naresh Mhaske | …यात शिवरायांचा अपमान नाही? नरेश म्हस्केंनी केली कविता

by nagesh
Naresh Mhaske | cm eknath shinde group naresh mhaske mocks sharad pawar sanjay raut sushma andhare

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – छत्रपती शिवाजी महाराज सध्या राज्यात वादाचा विषय आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी याला सुरुवात केली होती. त्यावर विरोधी पक्ष म्हणजे महाविकास आघाडीने भाजप आणि शिंदे गटावर टीका करण्यास सुरुवात केली. आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी ट्विटरवर एक कविता टाकत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांपासून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यापर्यंत सर्वांचा समाचार घेतला आहे. यात शिवरायांचा अपमान नाही, असा प्रश्न नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी उपस्थित केला आहे. शरद पवार म्हणतात, शिवरायांना जाणता राजा म्हणायची काहीच गरज नाही, यात शिवरायांचा अपमान नाही?

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

भ्रष्टवादींच्या गजभियेंना महाराज बनवून, ऐऱ्या गैऱ्याला मुजरा घालताना शरम वाटत नाही? यात शिवरायांचा अपमान नाही? शाहिस्त्याची बोटे छाटतानाच्या देखाव्यात शिवरायांना शरदमुखचंद्र कार्यकर्ते चिकटवतात. भ्रष्टवादीच्या अधिकृत अकाउंटवरून ट्विट करतात, यात शिवरायांचा अपमान नाही? येता जाता शिवरायांच्या प्रेमाचे स्वार्थी उमाळे येणाऱ्या शरद पवारांनी एकदाही एखादा गड चढला नाही, यात शिवरायांचा अपमान नाही? औरंग्याच्या कबरीवर वाहिली फुले, कबरीला त्या नराधमाच्या संरक्षण दिले, यात शिवरायांचा अपमान नाही? उद्धव ठाकरेंचा एक पोपट राऊत, दम तर तसा काहीच नाही भाऊत, पण मागतो पुरावे शिवरायांच्या वंशजांना, सिद्ध करा म्हणतो तुमच्या रक्तातल्या शिवाजींना, यात शिवरायांचा अपमान नाही? हजारो हिंदू यमसदनी धाडले, त्याच टिपू सुलतानाचे नाव यांनी पालिकेच्या मैदानाला दिले, यात शिवरायांचा अपमान नाही? अंधारे बाई तर कहरच करतात, निष्पापांच्या घरावर डल्ला मारणाऱ्या रौताला गुन्ह्यात अटक झाल्यावर, त्याच्या आईची तुलना जिजाऊशी करतात, यात शिवरायांचा अपमान नाही?

या कवितेत नरेश म्हस्के यांनी शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार संजय राऊत आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे हे सर्वच लोक
सहभागी आहेत, असा दावा केला आहे. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त
वक्तव्याचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे समाज माध्यमांवर त्यांना राज्यपालांवरदेखील बोला,
अशा प्रतिक्रिया येत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Naresh Mhaske | cm eknath shinde group naresh mhaske mocks sharad pawar sanjay raut sushma andhare

हे देखील वाचा :

Shahrukh Khan | …म्हणून युजर्सनी शाहरुखच्या साधेपणाचे केले कौतुक

Dattatreya Jayanti – 2022 | दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर सासवड-कापूरहोळ रोडवरील वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Pune Crime | ज्येष्ठाला लुटणाऱ्या कॅबचालकाला पोलिसांनी केली अटक; साथीदारांचा शोध सुरू

Related Posts