IMPIMP

Nashik Crime | मनमाड जवळ ट्रेकिंगसाठी गेलेल्या दोन गिर्यारोहकांचा मुत्यु, तर एक जखमी

by nagesh
Nashik Crime | 2 trekker dead 1 injured during hike in manmad of nashik

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइनNashik Crime | नाशिक जिल्ह्यातील मनमाड पासून चार किलोमीटर असलेल्या हडबीची शेंडी (Hadbi Chi
Shendi) अर्थात अंगठ्या डोंगरावर (थम्स अप) ट्रेकिंगसाठी गेलेल्या नगरच्या दोघा गिर्यारोहकांचा कड्यावरुन कोसळून मृत्यू (Trekker Died) झाला.
तर एक जण गंभीर जखमी (Injured) झाला आहे. त्यांच्यासोबतचे अन्य 13 जण सुखरूप आहेत. ही घटना (Nashik Crime) बुधवारी सायंकाळी सहा
ते साडे सहाच्या दरम्यान घडली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अहमदनगरच्या इंद्रप्रस्थ ट्रेकर्स ग्रुपचे (Indraprastha Trekkers Group Ahmednagar) हे गिर्यारोहक (Mountaineer) 8 दिवसांच्या मोहीमेसाठी गेले होते. बुधवारी सायंकाळी कडा उतरत असताना हा अपघात झाला. सर्व गिर्यारोहक खाली आल्यानंतर दोरखंड सोडताना मयूर दत्तात्रेय म्हस्के Mayur Dattatreya Mhaske (वय-24) व अनिल शिवाजी वाघ Anil Shivaji Wagh (वय-34 रा. सावेडी, नगर) हे कड्यावरुन खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. हे दोघेही निष्णात गिर्यारोहक होते. ते दोघे मामा-भाचे आहेत. तर प्रशांत पवार (Prashant Pawar) हा गिर्यारोहक जखमी झाला आहे. (Nashik Crime)

या घटनेची माहिती मिळाल्यावर नगरहून त्यांचे अन्य सहकारी रात्रीच मदतीसाठी रवाना झाले. अहमदनगर येथील इंद्रप्रस्थ ट्रेकर्स ग्रुप गिर्यारोहणाच्या धाडसी मोहिमा आयोजित करीत असतो. विशेषत: गडकिल्ल्यांवर विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यावर त्यांचा अधिक भर असतो. राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्या मोहिमा (Campaign) सुरु असतात. बुधवारी या ग्रुपतर्फे 8 मुली व 7 मुले असे 15 जणांचे पथक 8 दिवसांच्या ट्रेकिंग मोहिमेसाठी गेले होते. मनमाड जवळच्या (Manmad) हडबीची शेंडी येथून त्यांनी मोहिमेला सुरुवात केली.

सर्वजण डोंगर चढून गेले. अंगठ्याच्या आकाराच्या सुळक्यावर त्यांनी यशस्वी चढाई केली. यासाठी खिळ्यांच्या सहाय्याने रोपवे (Ropeway) बांधण्यात आला होता. त्यावरुन सर्वजण वर गेले. मोहीम यशस्वी झाल्यावर जल्लोष करण्यात आला. त्यानंतर सर्वांनी डोंगर उतरण्यास सुरुवात केली. पथकातील सर्वजण रोप-वेच्या मदतीने खाली उतरले. या ग्रुपचे ट्रेकर मयूर आणि अनिल यांच्यावर रोप-वेची जबाबदारी होती. त्यामुळे ते सर्वात शेवटी होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

खाली उतरताना ते रोप-वेचे खिळे काढून घेत होते. हे काम करताना एका ठिकाणी त्यांचा अंदाज चुकला आणि तिघेजण एका सुळक्यावरुन खाली पडले.
अन्य गिर्य़ारोहकांनी त्यांना डोंगरावरुन खाली आणण्यासाठी प्रयत्न केले.
यासाठी त्यांनी स्थानिक ग्रामस्थांची मदत घेतली. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरु होते.
तिघांनाही मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात (Sub-District Hospital) हलवण्यात आले.
तेथे वाघ व म्हस्के यांना मृत घोषित करण्यात आले. तर पवार याच्यावर उपचार सुरु आहेत.
अपघाताची माहिती मिळताच हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी झाली होती.

Web Title :- Nashik Crime | 2 trekker dead 1 injured during hike in manmad of nashik

हे देखील वाचा :

Maharashtra Police Uniform | पोलिस उप अधिक्षक ते उपनिरीक्षक या दर्जाच्या अधिकाऱ्यांची ट्युनिक गणवेशापासून सुटका, DGP संजय पांडे यांनी काढले आदेश

Ramdev Baba | योगगुरू रामदेव बाबांनी लॉन्च केले Credit Card; काय आहेत फायदे? जाणून घ्या

Parambir Singh | परमबीर सिंह यांचा खळबळजनक आरोप; म्हणाले – ‘सचिन वाझेवर तुरुंगात दररोज अत्याचार’

Related Posts