IMPIMP

Nashik MBBS Doctor Commits Suicide In Sinnar Lodge | नाशिकच्या डॉ. स्वप्नील पाटीलची सिन्नरमध्ये आत्महत्या; ‘या’ अवस्थेत आढळला मृतदेह; परिसरात खळबळ

by nagesh
Sangli Crime | doctor-sampat patil-committed-suicide-by-hanging-himself-in-Satyasai nagar near vishrambaug area sangli crime news

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइनNashik MBBS Doctor Commits Suicide In Sinnar Lodge | नाशिक मधील गंगापूर भागात (Gangapur Area) राहणाऱ्या एका MBBS डॉक्टरने सिन्नर (Sinnar) येथे एका लॉजमध्ये आत्महत्या (Suicide In Sinnar) केल्याचा प्रकार रविवारी (दि.10) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास उघडकीस आला. डॉ. स्वप्नील पाटील Dr. Swapnil Patil (वय – 37 रा. गंगापुररोड, नाशिक) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे (Doctor) नाव असून डॉ. पाटील यांनी यकृताचा बळावलेला आजार आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. डॉक्टर पाटील यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली सुसाइड नोट (Suicide Note) पोलिसांना (Nashik Crime) सापडली आहे. (Nashik MBBS Doctor Commits Suicide In Sinnar Lodge)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

डॉ. स्वप्नील पाटील यांनी सिन्नर शहरातील बसस्थानकाजवळील हिरालाल टॉवरमधील (Hiralal Tower) हॉटेल प्रेसिडेंट लॉजमध्ये शनिवारी (दि.9) दुपारी दीडच्या सुमारास आले. त्यांनी 109 नंबरची खोली भाड्याने घेतल्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता रूमच्या बाहेर आल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले. त्यानंतर त्यांनी खोलीचा दरवाजा उघडला नाही. रविवारी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास संशय आल्याने लॉज कर्मचाऱ्यांनी (Lodge Staff) दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्याने खिडकीतून आत आपले असता बेडवर डॉ. पाटील दिसून आले. (Nashik MBBS Doctor Commits Suicide In Sinnar Lodge)

माजी नगरसेवक शैलेश नाईक (Former Corporator Shailesh Naik) यांनी यासंदर्भात सिन्नर पोलीस ठाण्यात (Sinnar Police Station) माहिती दिली. त्यानंतर पोलीस उप निरीक्षक सुदर्शन आवारी (PSI Sudarshan Awari), हवालदार चेतन मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत खोलीचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी डॉ. पाटील यांचा मृतदेह (Dead Body) बेडवर पडलेला दिसून आला. ते स्वत: डॉक्टर असल्याने त्यांनी रुमच्या खिडकीला सलाईन (Saline) टांगून ते हाताला लावून घेतले होते. तसेच काही गोळ्याही त्यांनी सेवन केल्याचे आणि अर्धवट रिकामी पाकीटे मृतदेहाजवळ आढळून आले आहेत. याशिवाय दारुची बाटली घटनास्थळी पडलेली होती.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात (Sinnar Rural Sub-District Hospital) पाठवला. डॉक्टरांनी रक्तनमुना आणि व्हीसेरा राखून ठेवला असून डॉ. निर्मला गायकवाड (Dr. Nirmala Gaikwad) यांनी शवविच्छेदन केल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

सुसाईड नोटमध्ये सांगितले कारण…
डॉ. पाटील यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे.
यामध्ये त्यांनी हे कृत्य स्वत: च्या मर्जीने करत असून माझ्यावर कुठलाही दबाव नाही. पत्नीने आत्तापर्यंत खूप साथ दिली.
आई – वडीलांनी, भावाने काबाडकष्ट केले. मात्र लिवरच्या आजाराने (Liver Disease) त्रस्त असल्याने मी आत्महत्या करत असून त्यास इतर कोणालाही जबाबदार धरु नये.
मी माझे कर्तव्य पार पाडू शकलो नाही, त्याबद्दल मला क्षमा करावी.
आजारपणामुळे कर्ज झाले आहे. त्यामुळे आत्महत्येशिवाय पर्याय उरला नाही,
असे डॉ. पाटील यांनी सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले आहे.

Web Title :- Nashik MBBS Doctor Commits Suicide In Sinnar Lodge | Nashik MBBS Doctor Dr. Swapnil Patil Commits Suicide In Sinnar Lodge Hiralal Tower

हे देखील वाचा :

Raghunath Kuchik Rape Case | ‘चित्रा वाघ यांनीच मला गोव्यात डांबून ठेवलं’; रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेने केला खळबळजनक खुलासा

Alia Bhatt Affairs | अफेअर्सच्या बाबतीत रणबीर कपूरला सुद्धा आलियानं टाकलंय मागं, जाणून घ्या तिच्या 5 बॉयफ्रेंन्ड्सची नाव..

Maharashtra Temperature | दिलासादायक ! राज्यातील तापमानात किंचित घट होण्याची शक्यता

Related Posts