IMPIMP

Navneet Rana-Ravi Rana | कोर्टाने ठाकरे सरकारला फटकारलं ! राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं

by nagesh
Navneet Rana-Ravi Rana | navneet rana ravi rana hanuman chalisa row conditional bail sedition free speech

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Navneet Rana-Ravi Rana | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा निर्धार केला होता. त्यानंतर राणा दाम्पत्य आणि शिवसैनिक यांच्यात मोठं राजकीय शीतयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, राणा दाम्पत्याला राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली. तब्बल बारा दिवसांच्या तुरूंगवासानंतर राणांना कालच जामीन मिळाला. यावेळी राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा (Sedition Case) दाखल करणं चुकीचं असल्याचं म्हणत मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) ठाकरे सरकारवर (Thackeray Government) ताशेरे ओढले आहे. (Navneet Rana-Ravi Rana)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

न्यायालयाने राज्य सरकार (Maharashtra State Government) आणि मुंबई पोलिसांवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. राजद्रोहाचा थेट आरोप एखाद्यावर दाखल करणं चुकीचं आहे. कारण राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठणाचं जे आंदोलन पुकारलं होतं, ते आंदोलन करू नये यासाठी मुंबई पोलिसांनी त्यांना नोटीस दिली होती. या नोटिसीनंतर राणा दाम्पत्याने आपलं आंदोलन मागे घेतलं असून ते दोघेही आपल्या खार इथल्या निवासस्थानातून बाहेर पडले नव्हते. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे ही कारवाई बेकायदेशीर आणि चुकीची असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. (Navneet Rana-Ravi Rana)

दरम्यान, आरोपींनी मुख्यमंत्र्यांविरोधात व्यक्त केलेल्या भावना या आक्षेपार्ह असल्या तरी राजद्रोहाच्या गुन्ह्याबाबत आवश्यक असलेले घटक दिसत नाहीत, असं देखील निरीक्षण राणा दाम्पत्य यांच्याविरोधातील प्रकरणांची सुनावणी घेणाऱ्या विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे (Justice Rahul Rokade) यांनी आदेशात नोंदवले आहे.

Web Title :- Navneet Rana-Ravi Rana | navneet rana ravi rana hanuman chalisa row conditional bail sedition free speech

हे देखील वाचा :

Vasant More | ‘मी राजमार्गावरच, आमच्यात मतभेद आहेत पण मनभेद नाहीत’

UPSC Calendar 2023 | यूपीएससीने जारी केले कॅलेंडर, जाणून घ्या केव्हा होईल कोणती परीक्षा

Ramdas Athawale On BJP-MNS Alliance | ‘भाजपला मनसेची गरज नाही’; रामदास आठवले यांनी स्पष्टच सांगितलं

Related Posts