IMPIMP

Nawab Malik | नवाब मलिकांना धक्का, ईडीला मिळाली वांद्रे, कुर्ला आणि उस्मानाबाद येथील संपत्ती जप्त करण्याची परवानगी

by nagesh
Nawab Malik | ed authority allows seizure of ncp leader nawab malik s assets which is located in mumbai and osmanabad

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाईन  – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची संपत्ती जप्त (Assets Seizure) करण्याची परवानगी ईडीला (ED) मिळाली आहे. हा नवाब मलिक यांना मोठा धक्का मानला जात आहे. मलिक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीवर टाच येणार आहे. यामध्ये मुंबईतील गोवावाला कंपाऊंडमधील (Goawalla Compound) जमिनीचा एक भाग, कुर्ला पश्चिम येथील तीन फ्लॅट, वांद्रे पश्चिम येथील दोन फ्लॅट आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील (Osmanabad District) 147 एकर जमिनीचा समावेश आहे. नवाब मलिक (Nawab Malik) यांची संपत्ती जप्त करण्याबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांमध्ये सल्लामसलत सुरु आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मलिक सध्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) असून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. इडीला संपत्ती जप्त करण्याची परवानगी मिळाल्याने मलिक कुटुंबाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Underworld Don Dawood Ibrahim) याची दिवंगत बहीण हसीना पारकरशी
(Haseena Parkar) संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) ईडीने कारवाई करुन
फेब्रुवारी महिन्यात मलिक (Nawab Malik) यांना अटक (Arrest) केली. त्यानंतर एप्रिलमध्ये ईडीने मलिक
कुटुंबाची संपत्ती तात्पुरत्या स्वरुपात जप्त केली. अधिनिर्णय प्राधिकारणाने मलिक यांच्या कुटुंबाची संपत्ती
जप्त करण्याची मंजुरी दिली. जप्त केलेल्या मालमत्ता या मलिक, त्यांचे कुटुंबीय, सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रा. लि. (Solidus Investments Pvt. Ltd.) आणि मलिक इंफ्रास्ट्रक्चर कंपनीशी (Malik Infrastructure Company) संबंधित आहेत.

काय आहे प्रकरण?

हसीना पारकर, सलीम पटेल (Salim Patel) 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील
(1993 Mumbai Blasts Case) आरोपी सरदार खान (Sardar Khan) आणि नवाब मलिक यांनी
गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर (Munira Plumber) या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदेशीर हडपल्याचा आरोप आहे. या महिलेने 1999 मध्ये सली पटेलच्या नावाने पॉवर ऑफ एटर्नी जारी केली होती.
याचा दुरुपयोग करत हसीना पारकरच्या सांगण्यावरुन गोवावाला कंपाउंडमधील जमीन मलिक यांच्या
सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रा. लि. कंपनीला विकल्याचा आरोप आहे. ही जागा भाड्याने देऊन मिळालेल्या
पैशातून मलिक यांनी वांद्रे, कुर्ला आणि उस्मानाबाद येथे शेतजमीन खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  Nawab Malik | ed authority allows seizure of ncp leader nawab malik s assets which is located in mumbai and osmanabad

हे देखील वाचा :

Indian Society of Digital Dentistry | प्रगत दंतवैद्यक उपचार लोकाभिमुख करण्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्रीची स्थापना

T20 World Cup 2022 | वर्ल्ड कपमध्ये भारतीय बॉलर्सची धुलाई करणाऱ्या बॅट्समनला विराट कोहलीने दिले ‘हे’ खास गिफ्ट

Pune Crime | पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयाने गुंडाचा तरुणावर कुऱ्हाडीने वार, येरवाड्यातील घटना

Related Posts